Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire : दवर्लीत फर्निचरच्या दुकानाला आग; सात लाखांची हानी

मडगाव अग्निशम दलाच्या पथकाने धाव घेऊन ही आग विझविली. यात या दलाच्या पथकाला पाच लाखांपर्यंतची मालमत्ता वाचविण्यात यश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fire : पडत असलेल्या संततधार पावसातही मडगाव परिसरातील दवर्ली या ठिकाणी एका फर्निचरच्या दुकानाला आग लागून सात लाखांचे नुकसान होण्याचा प्रकार घडला. ही दुर्घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

दवर्ली येथील रोझरी चॅपल येथे असलेल्या मकबूल अहमद यांच्या फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली होती. या दुकानात प्लायवूडचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. या बरोबरच लाकडी साहित्य व कापण्यासाठी लागणारी मशिनरीही येथे होती. हे सर्व जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मडगाव अग्निशम दलाच्या पथकाने धाव घेऊन ही आग विझविली. यात या दलाच्या पथकाला पाच लाखांपर्यंतची मालमत्ता वाचविण्यात यश आले. फर्निचर दुकानाचे मालक मकबूल अहमद यांनी सांगितले की, पडत असलेल्या पावसामुळे येथील दुकानात विद्युत वाहिनीत पाणी शिरल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा प्रकार घडला असावा.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे तसेच फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यात मांडोप नावेली येथे असलेल्या एका घरावर झाड पडून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर १५ हजारांची मालमत्ता अग्निशमन दलाने वाचविली आहे. जाकनीबांद या परिसरातही एक आंब्याचे झाड उन्मळून रस्त्यावर पडले,अशी माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT