Goa Fire Emergency Services Dainik Gomantak
गोवा

15 दिवस, 635 कॉल्स आणि दीड कोटींची मालमत्ता वाचवली! पावसाच्या प्रत्येक संकटात 'अग्निशमन दल' मदतीचा आधार

Goa Fire Emergency Services: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांवर, वीजवाहिन्‍यांवर झाडे कोसळणे, रस्त्यांवरील अडथळे तसेच जनावरे अडकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

गोमंत्नक वृत्तसेवा

पणजी: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांवर, वीजवाहिन्‍यांवर झाडे कोसळणे, रस्त्यांवरील अडथळे तसेच जनावरे अडकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन व आपत्कालीन सेवा दल अधिक सतर्क झाले आहे.

मागील १५ दिवसांत अग्निशमन दलाला एकूण ६३५ कॉल्स प्राप्त झाले असून, त्यापैकी सुमारे ५१८ कॉल्स हे पाऊस आणि हवामानाशी संबंधित घटनांचे होते. या घटनांपैकी सुमारे ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे झाडांची पडझड आणि संबंधित आपत्कालीन परिस्थितीची होती.

दलाने वेळेवर प्रतिसाद देत विविध भागांतील घटनांवर नियंत्रण मिळवत सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता वाचवली, तर पावसामुळे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी झाडे वीजखांबांवर कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला, तर रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी विहिरीत व्यक्ती पडणे तसेच नैसर्गिक अडथळ्यांच्या घटनाही नोंदविल्या गेल्या. अशा प्रत्येक घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT