Awarapan 2 Box Office Collection: इम्रान हाश्मीचा सनी देओलला धोबीपछाड! 'आवारापन 2'ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

Awarapan 2 Box Office Collection: 14 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर इम्रान हाश्मीचा 'आवारापन 2' आणि सनी देओलचा 'पार्टेशन 1947' या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली.
Awarapan 2 Box Office Collection
Awarapan 2Dainik Gomantak
Published on
Updated on

Awarapan 2 Box Office Collection: 14 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर इम्रान हाश्मीचा 'आवारापन 2' आणि सनी देओलचा 'पार्टेशन 1947' या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला या लढतीत सनी देओलची हवा जास्त वाटत होती, मात्र जेव्हा ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. इम्रान हाश्मीचा 'आवारापन 2' हा चित्रपट कमाईच्या शर्यतीत खूप पुढे निघून गेला. ट्रेड तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट पहिल्या दिवशी 10-15 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज होता, परंतु इम्रान हाश्मीने सर्व अंदाज चुकीचे ठरवत विक्रमी कमाई केली.

'आवारापन 2' ने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 21 कोटींचे नेट कलेक्शन करुन सनी देओलला मोठ्या फरकाने मागे टाकले. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात 21 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून काल देशभरात त्याचे एकूण 9,033 शोज बुक झाले होते.

Awarapan 2 Box Office Collection
Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 25.20 कोटींच्या घरात पोहोचले. इतकेच नाही तर, चित्रपटाने परदेशातही 2 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरातून 27.20 कोटी रुपयांची शानदार कमाई करत हॉलिवूडच्या स्पायडरमॅनलाही मागे टाकले. विशेष म्हणजे 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'आवारापन' चित्रपटाचे एकूण जगभरातील कलेक्शन केवळ 12.18 कोटी रुपये होते, पण 'आवारापन 2' ने पहिल्याच दिवशी त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई करत नवा विक्रम रचला.

Awarapan 2 Box Office Collection
Salman Khan Matrubhoomi: दबंग सलमान खान पुन्हा अडचणीत, बहुचर्चित 'मातृभूमी' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; 'हे' कारण आले समोर

या बंपर ओपनिंगमुळे इम्रान हाश्मीच्या (Emraan Hashmi) 'आवारापन 2' ने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सुशांत सिंग राजपूतचा 'एम.एस. धोनी' (21.3 कोटी), सलमान खानचा 'दबंग २' (21 कोटी), शाहीद कपूरचा 'कबीर सिंग' (20.21 कोटी), 'आरआरआर' (20.07 कोटी) आणि शाहरुख खानच्या 'डंकी'ला (20 कोटी) मागे टाकले. दुसरीकडे, सनी देओलच्या 'पार्टेशन 1947' ने अत्यंत संथ सुरुवात केली असून चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरातून केवळ 8.34 कोटी आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर 5 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com