Goa Fire Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Case: कुंकळ्ळीतील मिनरल वॉटर कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

Goa Fire Case: औद्योगिक वसाहतीत भीषण आग; अग्निशामक दलाची तत्परता, कोट्यवधींचे नुकसान

Ganeshprasad Gogate

Goa Fire Case: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी रात्री आगीची घटना घडली. वीज पुरवठा खंडित केल्यावर कुंकळ्ळी अग्निशामक दलाकडून मशिनरीवर पाण्याचा मारा करीत ही आग विझवण्यात आली. या घटनेत कंपनीतील मशिनरीसह संगणक, टेबल, खुर्च्या अशा साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सिंडीज आयस्क्रीम फॅक्टरीनजीक असलेल्या डिमॅक इंडस्ट्रीजमधील मशिनरीला आग लागण्याची घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये मिनरल वॉटर बॉटल्समध्ये भरण्यात येते. आगीच्या घटनेनंतर कुंकळ्ळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी वीज पुरवठा खंडित केला आणि दीड तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकरा वाजता आगीवर नियंत्रण आणले.

या आगीमध्ये कंपनीतील पाणी बाटल्यामध्ये भरण्याचे मशिन, बाटल्या, सीलबंद करण्याची मशिन, पाणी बाटलीवर लेबल लावण्याचे मशिन यासह इतर मशिन्स व दोन संगणक, दोन टेबल, खुर्च्या असे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

यात कंपनीचे लाखाेंची हानी झालेली आहे. कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे स्टेशन अग्निशामक अधिकारी तृप्तेश नाईक यांच्यासह नीलेश नाईक, रमण गावकर, हरी पावस्कर, सिद्धांत आरोलकर, सौरभ शेटकर यांनी आग विझवण्याच्या कामगिरीत सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT