Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: वाद्यांच्‍या दुरुस्‍तीला वेग; पंढरपूरचे कारागीर दाखल

चतुर्थीची तयारी : तबल्‍यांचा ‘ताल’ घुमू लागला!

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2023 गोमंतकीयांचा सर्वांत मोठा आणि आवडता सण म्‍हणजे गणेश चतुर्थी. हा उत्‍सव आता जवळ आला आहे. श्रावण महिन्यात तसेच गणेश चतुर्थी काळात सर्वत्र ऐकू येतात ते भजनाचे स्‍वर. भजन म्हटले की पखवाज व हार्मोनियम ही वाद्यवृंदे आलीच.

त्‍यामुळे या वाद्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या हेडलॅण्ड-सडा येथे पंढरपूरहून आलेल्या कारागिरांकडे गर्दी वाढू लागली आहे. नवीन वाद्यवृंदे खरेदी करण्यापेक्षा वाद्ये दुरुस्त करण्याकडे भजन कलाकारांचा कल आहे. तबला, पखवाज, ढोलकी, हार्मोनियमच्या दुरुस्तीसाठी मोठी झुंबड उडत आहे.

पंढरपूर येथील ‘संतोष तबला मेकर्स’ खास भजनी कलाकारांच्या सेवेसाठी हेडलॅण्ड-सडा येथील श्री ईस्‍वटी लक्ष्मी नारायण मंदिराजवळ गेल्या १५ वर्षांपासून येतात. दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थीनिमित्त येऊन ते वरील वाद्यवृंदे दुरुस्‍त करून देतात.

आपल्या घरातील गणेश चतुर्थी सोडून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे कारागीर वाद्यांची दुरुस्ती करतात. संतोष भोसले व त्यांचे वडील नागनाथ भोसले हे कलाकारांना पखवाज, तबला, हार्मोनियम, वीणा, ढोल, ताशे व इतर सर्व प्रकारची वाद्ये दुरुस्त करून देतात.

तसेच त्यांच्याकडे नवीन वाद्येसुद्धा मिळतात. संतोष भोसले यांना स्वरांचे ज्ञान असल्यामुळे ही दुरुस्त केलेली वाद्ये योग्य प्रकारे ‘ट्यून’ झाली आहेत का हे तपासण्यासाठी ते स्वतः दुरुतीनंतर ती वाजवून पाहतात.

वाद्यांची योग्यरित्या दुरुस्ती करणे तसेच योग्य ‘ट्युनिंग’ करून देणे हेच आपल्या कामाचे समाधान आहे, असे संतोष भोसले म्हणतात. तबल्यासाठी लागणारे सिसमचे लाकूड मेरठमधील नागरडी येथून येते. त्‍याच्याही किमती वाढल्या आहेत.

तबल्याला लागणारी लोखंडाची राख अर्थात शाईच्या दरातही वाढ झाली आहे. हार्मोनियममध्ये पंजाब मॉडेलला मागणी अधिक आहे. त्याच्या दुरुस्तीचे साहित्य मुंबई, पंजाब, नागपूर, कोलकाता येथून कोल्हापूरात येते. त्यांच्याही किमती वाढल्या आहेत, असे भोसले सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT