Goa Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Festival: भाविकांनी उधळला गुलाल; गोव्यातील इंत्रुजोत्सवाचा समारोप

डोंगरी गावात साजरा केला जाणारा वार्षिक इंत्रुजोत्सावाचा बुधवार, 15 रोजी गुलालोत्सवानंतर समारोप झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Festival: डोंगरी गावात साजरा केला जाणारा वार्षिक इंत्रुजोत्सावाचा बुधवार, 15 रोजी गुलालोत्सवानंतर समारोप झाला. मेळ झाल्यानंतर काल सकाळी भक्तिभावाने गुलालोत्सव साजरा करण्यात आला. इंत्रुजोत्सव हा गोव्यातील शिमगोत्सवाचा प्रारंभ असून राज्यातील रंगपंचमीदेखील येथे साजरी केली जाते. कालपासून गोव्यात शिमगोत्सवास सुरवात झाली आहे.

इंत्रुजोत्सवाची सुरवात शुक्रवार, 10 रोजी झाली होती. पहिल्या दिवशी श्री जगदंबा षष्टी शांतादुर्गाच्या मंदिरात फट्या सुवारी विधी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार, 11 रोजी धार्मिक विधी झाले.

त्यात पारंपरिक वाद्य वाजवून उत्साहाने हा सोहळा झाला होता. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी रविवार, 12 व सोमवार, 13 रोजी देवीच्या छत्रीची डोंगरी, मंडूर, आजोशी आणि नेवरा गावात सुवारी निघाली होती.

मंगळवार, 14 रोजी पारंपरिक रोमटामेळ मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात डोंगरी गावातील धाकटे आणि थोरले भाटातील पाच देवस्थान मंडप सहभागी होतात.

भाविकांची अलोट गर्दी

आज शेवटच्या दिवशी गुलालोत्सवाने इंत्रुजोत्सवाचा समारोप झाला. काल मेळाच्या दिवशी पारंपरिकरीत्या डोंगरीत मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले होते. इंत्रुजोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांची अलोट गर्दी झाली होती. प्रत्येकजण या उत्सवाचा आनंद लुटत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Mormugao Municipality Waste Segregation Training: मुरगाव पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कचरा वर्गीकरणाचे चार टप्पे; प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Bicholim Food Court: डिचोलीतील 'फूड कोर्ट' अंधारात; दीड महिन्यापासून वीज दिवे बंद; व्यावसायिकांचा उदरनिर्वाह धोक्यात

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

SCROLL FOR NEXT