Goa Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: फेरीबोटीतून दुचाकींना पुन्हा मोफत प्रवास; अधिसूचना केली प्रसिद्ध

विरोधी पक्ष, नागरिकांनी शुल्कवाढीच्या निर्णयाला केला होता जोरदार विरोध

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Ferry Boat: गोव्यातील विविध बेटांवरून फेरीबोटीतून शहरात येण्यासाठी राज्य सरकार मोफत सेवा देत होते.

गेल्या काही दिवसांत मात्र ही सेवा सुधारता यावी आणि सरकारलाही त्यातून महसूल मिळावा यासाठी फेरीबोटीतून दुचाकी आणि चार चाकी गाड्यांना मासिक देण्याची योजना आखण्यात आली होती.

तथापि, राज्य सरकारच्या या योजनेला विरोधी पक्षांनी तसेच स्थानिक नागिरकांना जोरदार विरोध दर्शवला. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतचा निर्णय रद्द केला.

चोडणवासीयांनी जोपर्यंत पूल बांधत नाही तोपर्यंत दरवाढ करू नका, अशी जोरदार मागणी करत शुल्कवाढीला विरोध दर्शवला होता. सत्ताधारी भाजपवर या विषयावरून विरोधी काँग्रेस पक्षाने टीकास्त्र सोडले होते.

त्यामुळे तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सरकार हे दर मागे घेणार, असे वाटत होते. तसा निर्णय सरकारने घेतला.

चोडणवासीयांनी जोपर्यंत पूल बांधत नाही तोपर्यंत दरवाढ करू नका, अशी जोरदार मागणी करत शुल्कवाढीला विरोध दर्शवला होता. सत्ताधारी भाजपवर या विषयावरून विरोधी काँग्रेस पक्षाने टीकास्त्र सोडले होते.

त्यामुळे तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन सरकार हे दर मागे घेणार, असे वाटत होते. तसा निर्णय सरकारने घेतला.

त्यामुळे आता पुन्हा जुने दर लागू असणार आहे. त्यानुसार दुचाकींसाठी फेरीबोट सवारी मोफत असणार आहे. जल वाहतूक खात्याने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

याशिवाय चार चाकी वाहनांना फेरीबोट सवारीसाठी वाढवण्यात आलेले शुल्कही कमी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

SCROLL FOR NEXT