Girl Hair Stuck in Gearbox Dainik Gomantak
गोवा

Girl Hair Stuck in Gearbox: गोव्यात फेरीबोटीत थरार! हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये अडकले दहावीच्या विद्यार्थिनीचे केस

Goa Ferry Accident News: रायबंदर ते चोडण जलमार्गावर कार्यरत ‘शिवनेरी’ फेरीबोटीच्या हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये एका मुलीचे केस अडकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रायबंदर ते चोडण जलमार्गावर कार्यरत ‘शिवनेरी’ फेरीबोटीच्या हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये एका मुलीचे केस अडकले. मात्र, प्रसंगावधान राखून फेरीबोटचालकाने तात्काळ गिअर बॉक्स बंद केला आणि लोकांच्या मदतीने तिचे बॉक्समध्ये अडकलेले केस कापून सुटका केली.

ही मुलगी डिचोलीतील अवर लेडी ऑफ ग्रेस स्कूलची दहावीची विद्यार्थिनी आहे. सोमवारी रात्री या फेरीबोटीत गर्दी होती. त्यामुळे त्या मुलीला हायड्रोलिक गिअर बॉक्सजवळ उभे रहावे लागले. यावेळी वाऱ्यामुळे तिचे केस उडाले आणि गिअर बॉक्समध्ये अडकले. मुलीचे केस यंत्रात अडकल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी आरडाओरडा केल्याने कॅप्टनने फेरीबोट थांबविली. त्यानंतर त्या मुलीचे केस कापून सुटका केली.

यापूर्वी या फेरीबोटींवर कर्मचाऱ्यांद्वारे लोखंडी रॅम्प खाली-वर केला जात होता. मात्र, दोन कर्मचाऱ्यांची बोटे या यंत्रात अडकण्याच्या घटना घडल्यामुळे नव्याने तयार केलेल्या फेरीबोटींवर हायड्रोलिक यंत्रणा बसविली आहे. ती यंत्रणा पूर्ण सुरक्षित आहेत. मात्र, प्रवाशांनी अशा ठिकाणी उभे राहणे टाळावे. गर्दी असल्यास सुरक्षित ठिकाणी उभे रहावे. असे अपघात घडू नयेत यासाठी आम्हीही काळजी घेऊ, असे आवाहन नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी केले.

धास्तावलेल्या मुलीला भोवळ

अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्या मुलीला भोवळ आली. त्यावेळी बोटीतील प्रवाशांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. काही वेळाने तिच्या भावाने संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांच्याकडे वाहनाची व तिच्यावरील उपाचारासाठी मदत मागितली. त्या मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन पाठविले, असे विक्रमसिंह राजे भोसले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E20 Petrol: पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार? केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्टच सांगितले!

BJP Election Preparation 2027: गोव्यात 50 टक्क्यांहून अधिक मतांचे लक्ष्य! भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नितीन नवीन यांचा कार्यकर्त्यांना 'बुस्ट'

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

SCROLL FOR NEXT