पणजी: १९९१ मध्ये आल्वेर्नाझ आलेमाव यांची कार सोन्याच्या तस्करीच्या संशयावरून तपासणीसाठी थांबवण्याचे धाडस दाखवणारे कस्टम अधिकारी कॉस्ताव फर्नांडिस यांच्या जीवनावर चित्रपट आला आहे. कॉस्ताव नावाचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होणार आहे.
कॉस्ताव यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत आल्वेर्नाझ यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कॉस्ताव कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून त्यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला खटला चालला आणि २३ वर्षांनी त्यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात कॉस्ताव या धाडसी कस्टम अधिकाऱ्याची कहाणी उलगडणार आहे.
कॉस्ताव हे आता ७१ वर्षांचे असून ते अंधेरी-मुंबई येथे वास्तव्यास असतात. कॉस्ताव यांनी त्यावेळेस जप्त केलेल्या सोन्याचे वजन सुमारे २५० किलो होते आणि त्याची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये होती.
‘हा मृत्यू जाणूनबुजून नव्हता, तो अपघाताने झाला. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झटत होतो. मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असल्यामुळे मी स्वतःचे रक्षण करू शकलो. मला अल्वेर्नाझ अलेमाव यांच्या मृत्यूचे खोटे आरोप लावून फसवण्यात आले,’ असे कॉस्ताव यांचे म्हणणे आहे. केवळ गोमंतकीयच नव्हे, तर जगभरातील लोकांपर्यंत या सत्यकथेचा प्रकाश पडणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
चित्रपटातील काही दृश्ये गोव्यात चित्रीत करण्यात आली आहेत, तर काही मुंबईत. मी टिप देणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली आहे. वास्तवदर्शी वाटावे यासाठी थोडीफार कोकणी भाषा वापरली आहे. धृव सिंको व श्रवण फोंडेकर या गोमंतकीय कलाकारांच्या भूमिकाही या चित्रपटात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.