Konkani Film Festival: गोमंतकीय कलाप्रेमींसाठी खास पर्वणी! वास्कोत रंगणार कोकणी चित्रपट महोत्सव

Vasco Konkani Film Festival: कोकणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन रवींद्र भवन, बायणा-वास्को येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले आहे.
Konkani Film Festival
Konkani Film FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : रवींद्र भवन, बायणा-वास्को यांच्या वतीने मुरगाव तालुक्यातील लोकांसाठी २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सायं. ७ ते रात्री ९ वा. या वेळेत कोकणी चित्रपट महोत्सवाचे आयोजन रवींद्र भवन, बायणा-वास्को येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले आहे.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, चित्रपट निर्माते लक्ष्मीकांत शेटगावकर या महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी असतील.

चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी दोन कोकणी लघुपट ‘आदेस’ आणि ‘सवंग’ यांनी होणार आहे. तसेच ‘श्री गजानन गणराया’ आणि ‘श्री दामोदर माझ्या देवा’ हे दोन म्युझिक व्हिडिओ दाखवले जाणार आहेत.

Konkani Film Festival
Missing Child Mapusa: खोर्लीमध्ये हरवलेला 2 वर्षांचा चिमुकला सुखरूप सापडला, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

मंगळवार, २५ रोजी सायं. ७ वा. कोकणी फिचर फिल्म ‘काजरो’ आणि बुधवार, २६ रोजी कोकणी फिचर फिल्म ‘पेद्रू पोदेर’ प्रदर्शित होणार आहे. चित्रपट महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत रवींद्र भवन बायणाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, दिलीप काजळे, दामू कोचरेकर, सदानंद घोणसेकर, रवळनाथ पेडणेकर, प्रवेश आमोणकर, शांताराम पराडकर, अंकुश च्यारी आदी सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com