Goa Federation onion scam
नाशिक: गोवा फेडरेशनकडून नाफेडला साडेपाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोवा फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाफेड आणि नाशकातील फेडरेशनकडून १,५८९ मेट्रीक टन कांदा ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करुन तो बाजारात चढ्या दराने विक्री केल्याचा आरोप नाईक यांच्यावर करण्यात आला आहे.
नाफेडचे कर्मचारी जयंत रमाकांत कारेकर यांनी या फसवणुकीच्या प्रकाराबद्दल मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशनने 22 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत नाफेडकडून सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला.
गोवा फेडरेशने अल्पदराने खरेदी केलेला कांदा चढ्या दराने बाजारात विक्री करुन नाफेडला ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांचा गंडा घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत हा कांदा गोवा फेडरेशनकडून नाफेडच्या योजनेनुसार सामान्य जनतेला उपलब्ध करून देणे गरजेचे होते. पण, काशिनाथ नाईक यांनी स्वत:च्या फायद्यासाठी चढ्या दराने कांद्याची विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.