Goa FDA raid seizes 120 kg adulterated sweets from Belgaum supplier Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Action: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

Goa FDA Raid Taleigao Sweets: अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यान्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली जात असून मंगळवारी (11 ऑगस्ट) ताळगाव येथे एक मोठी कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

पणजी: अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यान्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली जात असून मंगळवारी (11 ऑगस्ट) ताळगाव येथे एक मोठी कारवाई करण्यात आली. बेळगावातून गोव्यात विक्रीसाठी आणली जाणारी सुमारे 120 किलो निकृष्ट आणि असुरक्षित मिठाई एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. जप्त करण्यात आलेली ही मिठाई आरोग्यासाठी हानीकारक असल्याने त्यांच्याकडून नष्टही करण्यात आली. या कारवाईमुळे गोव्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणणाऱ्या पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ताळगाव परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका खाजगी एर्टिका कारला (क्रमांक KA 22 MB 2137) एफडीएच्या पथकाने अडवले. या वाहनाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची मिठाई आढळून आली, जी गोव्यातील स्थानिक विक्रेत्यांना पुरवली जाणार होती. या मिठाईचा मुख्य पुरवठादार बेळगाव येथील हस्तीमल गोहिलोट हा असल्याचे समोर आले.

धक्कादायक बाब म्हणजे, मिठाई तयार करण्यासाठी या पुरवठादाराकडे कोणतेही वैध 'एफएसएसएआय' (FSSAI) लायसन्स नव्हते. कोणत्याही परवान्याशिवाय आणि सुरक्षिततेचे नियम न पाळता हा व्यवसाय बेकायदेशीररित्या सुरु होता.

या गंभीर प्रकारानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 120 किलो मिठाईचा साठा जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली. या बेकायदेशीर व्यवसायाचे मूळ बेळगावात असल्याने पुढील कडक कारवाईसाठी हा गुन्हा बेळगाव एफडीएकडे वर्ग करण्यात आला. तसेच, मिठाईच्या व्यावसायिक वाहतुकीसाठी खाजगी कारचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) देखील लेखी अहवाल पाठवून वाहनावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. गोव्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT