गोवा

FDA Raids: तूप-जिऱ्याच्या पावडरला 'एफडीए'चा दणका; 5 निकृष्ट उत्पादनांवर तात्काळ विक्रीबंदी, बाजारातील साठा मागे घेण्याचे आदेश

Goa FDA Food Product Ban: गोव्यातील बाजारपेठेत विक्रीस असलेल्या काही नामांकित ब्रँडच्या तूप आणि जिरे पावडरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील बाजारपेठेत विक्रीस असलेल्या काही नामांकित ब्रँडच्या तूप आणि जिरे पावडरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) आदेशानुसार या उत्पादनांची विक्री तात्काळ बंद करून बाजारातील उपलब्ध साठा मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे आणि मानवी आरोग्यास असुरक्षित असल्याचे तपासणीत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील घाऊक व्यापारी, वितरक, किरकोळ विक्रेते, डिपार्टमेंटल स्टोअर्स तसेच ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सना संबंधित उत्पादनांची विक्री त्वरित थांबवावी लागणार आहे.

ग्राहकांनी श्री सारस, गोकुळ आणि श्रद्धा ब्रँडचे संबंधित तूप तसेच एव्हरेस्ट जिरे पावडरचा वापर तत्काळ बंद करावा. ही उत्पादने विक्रीस असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासन संचालनालय, बांबोळी येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त व संचालिका श्वेता देसाई यांनी केले आहे.

तर दंडात्मक कारवाई

आदेशाचे उल्लंघन करून संबंधित उत्पादनांचा साठा किंवा विक्री केल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दिवसभर कष्ट, फुटपाथवर विसावा अन् पहाटे काळाचा घाला; पणजीत कारच्या धडकेत मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Nana Patekar Famous Dialogues: 'एक मच्छर...' पासून 'कंट्रोल उदय कंट्रोल'पर्यंत! नाना पाटेकरांचा दमदार आवाज अन् जबरदस्त डॉयलॉग VIDEO

Nana Patekar Kargil War Story: दुष्मनांसमोर छाती ठोकपणे उभे राहिले, संरक्षण मंत्र्यांकडून घेतली होती विशेष परवानगी; नाना पाटेकरांच्या आयुष्यातील 'तो' थरारक प्रसंग

EPFO UPI Withdrawal: खूशखबर! आता गुगल पे आणि फोनपेवरुन काढता येणार पीएफचे पैसे, डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम?

BJP Goa: 'सेवा ज्योती'ने दाखवली भाजपची ताकद; CM सावंत-नाईकांसह मंत्री, आमदार रस्त्यावर, 4 महिन्यांवरच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT