Indian Super League Football Dainik Gomantak
गोवा

Indian Super League Football: ओडिशा एफसीला 3-2 फरकाने नमवत एफसी गोवाचा झुंजार विजय

एफसी गोवाची एका गोलच्या पिछाडीवरून अफलातून विजयाची नोंद

किशोर पेटकर

Indian Super League Football: सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये जय गुप्ता याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने एका गोलच्या पिछाडीवरून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अफलातून विजयाची नोंद केली.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने अटीतटीच्या लढतीत ओडिशा एफसीला 3-2 असे नमवून स्पर्धेतील सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी सामना झाला. मुर्तदा फाल याने सहाव्या मिनिटास गोल केल्यामुळे ओडिशा एफसीला आघाडी मिळाली, ती त्यांनी पूर्वार्ध संपेपर्यंत टिकवून ठेवली.

55 व्या मिनिटास एफसी गोवा संघाला पेनल्टी फटका मिळाली. यावेळी नोआ सदोई याने अचूक फटक्याद्वारे एफसी गोवाला बरोबरी साधून दिली. नंतर 68 व्या मिनिटास सदोई याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केल्यामुळे एफसी गोवापाशी 2-1अशी आघाडी जमा झाली.

81 व्या मिनिटास मुर्तदा फाल याने आणखी एक गोल केल्यामुळे सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाने 2-2 अशी बरोबरी साधली. सामन्याच्या इंज्युरी टाईममधील खेळ रंगतदार ठरला. 90+6 व्या मिनिटास जय गुप्ता याच्या डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल झाला.

एफसी गोवाने पहिल्या लढतीत पंजाब एफसीवर १-० गोलने मात केली होती. आता त्यांचे दोन लढतीतून सहा गुण झाले आहेत. ओडिशा एफसीने अगोदरच्या लढतीत चेन्नईयीन एफसीला २-० असे हरविले होते, तर मुंबई सिटीला २-२ असे गोलबरोबरीत रोखले होते.

स्पर्धेतील या पहिल्या पराभवामुळे ओडिशाचे चार गुण कायम राहिले. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना 21ऑक्टोबर रोजी ईस्ट बंगालविरुद्ध भुवनेश्वर येथे खेळला जाईल. ओडिशाचा पुढील सामना 27 ऑक्टोबरला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होईल.

लोबेरा यांना गोव्यात धक्का

ओडिशा एफसीचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक व ते गोव्यात मार्गदर्शक या नात्याने सफल ठरले होते. ते मुंबई सिटीचे प्रशिक्षक असताना कोविडमुळे आयएसएल स्पर्धा 2020-21 मध्ये गोव्यात झाली होती.

तेव्हा मुंबई सिटीने लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल करंडक लीग विनर्स शिल्ड पटकावली होती. यावेळी ओडिशाचे मार्गदर्शक या नात्याने लोबेरा यांना विजयी कामगिरीने हुलकावणी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT