Goa NCP गोव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडली नसून ती एकसंघ आहे. आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहोत. अजित पवार यांच्या गटाने शंभू परब यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली निवड ही असंविधानीक असल्याचे विधान गोवा एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी केलेय.
तर गोवा एनसीपीचे निरीक्षक क्लाईड क्रास्टो यांनी जुझे फिलीप डिसोझा हेच गोव्यातील पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असल्याचा पुनरुच्चार केलाय.
विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्यांची संयुक्त बैठक दिल्लीत कॉस्टीट्यूशन क्लबच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत गोव्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीची माहिती जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली.
बैठकीत लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीला असलेल्या संधीबाबत भाष्य केले गेले. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न आणि आगामी काळात राबवण्यात येणारे उपक्रम याचाही उल्लेख भाषणात केला.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांना राज्यांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटनात्मक काम वाढवण्याचा आदेश देत अजित पवार गटाने दुसरा प्रदेशाध्यक्ष जरी नेमला असता तरी विचलित न होता पक्ष बळकट करण्याचे काम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.