Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: ओव्हरटेक करण्याच्या नादात बुलेटची दुचाकीला धडक; थिवी येथील अपघातात राजस्थानचा युवक ठार

Goa Road Accident: दलवीर रस्त्यावर फेकला गेला आणि तोंडावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला.

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: राज्यात चोरी, अमली पदार्थांसोबतच अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी रात्रौ 8 च्या सुमारास म्हापसा - पणजी मार्गावर थिवी येथे एक अपघात झाला असून या अपघातात राजस्थानातील एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

म्हापसा बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बुलेट घसरून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात बुलेटचालक दलवीर सिंह (19, राजस्थान) हा जागीच ठार झाला. बुलेटवरील दोघे आणि दुसऱ्या गाडीवरील एक मिळून असे तिघे जखमी झाले.

हा अपघात शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडला. दलवीर हा दोन मित्रांसमवेत करासवाडाहून अस्नोडाच्या दिशेने जात असताना, बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची बुलेट घसरली आणि समोरून येणाऱ्या केटीएम दुचाकीला तिची जोरात धडक बसली.

यावेळी दलवीर रस्त्यावर फेकला गेला आणि तोंडावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. बुलेटवर मागे बसलेले बलराम सिंग आणि मनोज सिंग हे जखमी झाले. केटीएमवरील चालक शुभम हासुद्धा किरकोळ जखमी झाला. कोलवाळ पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

मिळलेल्या माहिती नुसार दलवीर सिंह आज (शनिवारी) सकाळीच राजस्थानहून गोवा फिरण्यासाठी आला होता. तसेच त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याची गंभीर बाबही समोर आलीय.

या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घटनास्थळी कोणतेही वाहन उपलब्ध झाले नसल्याने त्यांना वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT