farmers now online Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील शेतकरी आता ‘ऑनलाईन’!

शेतकऱ्यांची व्यथा मांडताना अन्न ‘डाउनलोड’ करता येते का?

Chetan Lakkaibailkar

पणजी: शेतकऱ्यांची व्यथा मांडताना अन्न ‘डाउनलोड’ करता येते का? असा प्रश्‍न हल्ली सोशल मीडियातून विचारला जातो. शेतीमाल कोणत्याच ॲपवरून डाउनलोड करता येत नसला, तरी शेतकरी आता ‘डिजिटल’ झाला आहे. सर्वच क्षेत्रांचे झपाट्याने डिजिटलायझेशन होत आहे. त्यात आता शेतकरीदेखील मागे राहिलेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधन संस्था, कृषी, पशू वैद्यकीय खात्याने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. त्याला मिळणारा शेतकऱ्यांचा प्रतिसाद चकीत करणारा आहे.

शेतकऱ्यांना शेती आणि शेती विषयक योजनांची माहिती व कृषी उत्पादनाविषयी जागृती यासह हवामानाची माहिती देण्यासाठी विविध प्रकारचे ॲप, वेबपोर्टल, डिजिटल प्रकाशने आणि विशेष म्हणजे व्‍हॉट्सॲप ग्रुप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. कृषी संबंधित खात्याकडून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. याबाबत कृषी खात्याचे अधिकारी सांगतात, कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हॉट्सॲप ग्रुपचा फायदा झाला.

Goa farmers now online

डिजिटल प्‍लॅटफॉर्मवर शेतकरी त्यांच्या समस्या मांडतात, तेव्‍हा त्या समस्यांवर चर्चा होते. त्यातून त्या समस्येवर उपायही निघतो. अधिकची माहिती शेतकऱ्यांना मिळते. म्हणूनच हल्ली या प्लॅटफॉर्मचा वापर शेतकऱ्यांकडून वाढला आहे. भारतीय किनारी कृषी संस्थेच्या फर्टिलायझर कॅल्क्युलेटर ॲपमुळे पिकांना कधी, किती खत, कीटकनाशक द्यावे हे कुणालाही न विचारता घरबसल्या जाणून घेता येते. अशा ॲपना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

डिजिटल माध्यमांमुळे एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला जातो. विशेष म्हणजे विविध ॲप आणि वेबसाईटमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अचूक माहिती मिळते. 7 हजार शेतकरी व्हॉट्सॲपवर जोडले गेले आहेत. त्‍यांना प्रत्येक आठवड्याला हवामानावर आधारित कृषीविषयक माहिती दिली जाते. - डॉ. गोपाळ महाजन, शास्त्रज्ञ (माती परीक्षण)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT