नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Goa Assembly Monsoon Session 2025: आमदार विजय सरदेसाई यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना CM डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
Name change legal issues
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'नावात काय आहे' हे शेक्सपिअरचे विधान पुढे वाक्प्रचार ठरला. परंतु ह्याच नावाच्या मुद्यावरून सोमवारी (०४ ऑगस्ट) विधानसभेत गंभीर चर्चा झाली.

नाव आणि आडनावातील बदल कायद्याअंतर्गत ज्यांनी नावे आणि आडनावांत बदल केलेले आहेत, अशा सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केलेले आहेत, अशांना तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभा सभागृहात दिली. आमदार विजय सरदेसाई यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

Name change legal issues
ओल्ड गोवा चर्च परिसरातील बेकायदेशीर बंगला पाडा; विरोधकांनी दणाणून सोडले सभागृह, 10 स्थगित करावे लागले कामकाज

परराज्यांतून गोव्यात येऊन राहणारे अनेकजण नावे आणि आडनावांत बदल करून गोव्यातील आडनावे लावतात. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. अशी प्रकरणे वाढत असल्याने गोव्याची ओळख नष्ट होत असल्यावा दावा आमदार सरदेसाई यांनी केला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगश, कार्लस फेरेरा, आल्टन डिकॉस्टा यांनीही सरदेसाई यांनी सूचनेला पाठिंबा दिला.

... तर कायद्यातही बदल करू!

१) नावे आणि आडनावे बदलल्याच्या प्रकरणांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास कायद्यातही बदल करण्याची हमीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

२) बेकायदेशीररीत्या सुरू असलेली अशी प्रकरणे रोखण्यासाठी कायद्यात बदल करा, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fatorda Illegal Casinos
Carlos Ferreira On Hat Katro Khamb
vijai sardesai warns goa govt
Baga beach viral video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com