Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

India West Indies Test Series: इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाचा पुढील असाइनमेंट वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जातील.
India vs West Indis
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India West Indies Test Series: पाच कसोटी सामन्यांच्या रोमांचक मालिकेत भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. विजयासाठी भारताने दिलेल्या 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 367 धावांवर सर्वबाद झाला. या विजयात युवा भारतीय खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. आता या विजयानंतर भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका

इंग्लंड (England) दौऱ्यानंतर भारतीय संघाचा पुढील असाइनमेंट वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जातील. इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेतही संधी मिळण्याची शक्यता आहे. या मालिकेचा पहिला सामना 2 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. त्यानंतर, दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होतील.

India vs West Indis
Team India: "मी आत्महत्या करणार होतो", टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा धक्कादायक खुलासा; क्रिडाविश्वात खळबळ

इंग्लंड दौऱ्यात भारतीय खेळाडूंचे दमदार प्रदर्शन

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. कर्णधार शुभमन गिल हा मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 75.40 च्या प्रभावी सरासरीने एकूण 754 धावा केल्या, ज्यात चार शतकांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघाने दोन सामने जिंकून कपिल देव, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमांची बरोबरी केली. गिलनंतर केएल राहुलने (KL Rahul) 532 धावा करत दोन शतके झळकावली.

गोलंदाजीमध्ये, मोहम्मद सिराजने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. तो या मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळेच भारताला निर्णायक क्षणी विकेट्स मिळाल्या. सिराजला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांनी चांगली साथ दिली. या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 14-14 विकेट्स घेतल्या.

India vs West Indis
Team India Record: अखेर भारतानं करून दाखवलं! 148 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेल्या 'या' विश्वविक्रमावर भारताचा कब्जा

पुढील वाटचालीसठी सकारात्मक संकेत

इंग्लंडविरुद्धच्या या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. संघातील युवा खेळाडूंनी कठीण परिस्थितीतही आपले कौशल्य सिद्ध केले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात एक नवीन उत्साह आणि जिद्द दिसत आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही हेच खेळाडू आपला फॉर्म कायम ठेवतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. आता भारतीय क्रिकेटप्रेमींना ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या या रोमांचक मालिकेची उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com