Goa Rain Updates: परतीच्या पावसाचा डिचोलीत तडाखा

गोव्यात भातशेतीची नासाडी,शेतकरी चिंताक्रांत
Return rain destroyed rice farming in Goa
Return rain destroyed rice farming in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने (Goa Rian) दोन दिवसांनी काल (सोमवारी) पुन्हा तडाखा दिल्याने डिचोलीतील (Bicholim) काही भागात भातशेती (Rice Farming) आडवी झाली असून, यंदा भात पिकाची नासधूस अटळ असल्याची भिती व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह पावसाने डिचोलीतील बहूतेक भागात तडाखा दिला. पावसाच्या तडाख्यामुळे मये आदी काही भागात काही प्रमाणात भात शेती आडवी झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल बनला आहे. परतीच्या पावसाचा आणखी तडाखा बसल्यास भातशेतीची नासाडी ठरलेली आहे. अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Return rain destroyed rice farming in Goa
Weather Updates:दोन दिवसात देशात मुसळधार केरळमध्ये रेड तर कर्नाटक तमिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट

भातशेतीची नाशाडी अटळ

डिचोलीतील विविध भागातील भातशेतीला कणसे धरली आहेत. मये आदी काही भागात शेती पिकण्याच्या वाटेवर आहे. आता परतीच्या पावसाचा तडाखा सुरु झाल्याने बळीराजा अस्वस्थ बनला आहे. गेल्या बुधवारी जोरदार पाऊस पडल्यानंतर शनिवारी आणि सोमवारी पावसाचा तडाखा बसला. परतीच्या पावसाची वक्रदृष्टी चालूच राहिली, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच यंदा भातशेती समाधानकारक बहरलेली नाही. त्यातच आता पावसाचे संकट, त्यामुळे यंदाही भातपिक धोक्यात येण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com