Loan Dainik Gomantak
गोवा

Goa Farmers Loan Scheme: शेतकरी, मच्छिमारांसाठी महत्वाची बातमी! 4% व्‍याजाने पाच लाखांपर्यंतचे कर्ज; अधिसूचना जारी

Goa Agriculture Loan: राज्‍यातील कृषी तसेच मत्‍स्‍योद्योग व्‍यवसायात असलेल्‍या शेतकऱ्यांना आता चार टक्‍के व्‍याजदराने पाच वर्षांसाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज देणारी योजना कृषी खात्‍याने सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यातील कृषी तसेच मत्‍स्‍योद्योग व्‍यवसायात असलेल्‍या शेतकऱ्यांना आता चार टक्‍के व्‍याजदराने पाच वर्षांसाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज देणारी योजना कृषी खात्‍याने सुरू केली आहे. कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

जमीन कसणाऱ्या तसेच मत्‍स्‍योद्योगात कार्यरत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांचे आपत्‍कालीन कर्ज घेता येणार आहे. शिवाय त्‍यांना पाच लाखांचेही कर्ज घेण्‍याची मुभा असेल.

ही योजना १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ या तीन वर्षांच्‍या कालावधीसाठी असेल. त्‍यानंतर योजनेच्‍या पुढील अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन केले जाईल. परंतु, शेतकऱ्यांना कर्ज फेडण्‍यासाठी पाच वर्षांचा कालावधी असेल.

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्‍यावसायिक बँका, गोवा राज्‍य को-ऑपरेटिव्‍ह तसेच कृषी को-ऑपरेटिव्‍ह बँकांकडून कर्ज घेता येईल, असे फळदेसाई यांनी जारी केलेल्‍या अधिसूचनेत म्‍हटले आहे.

...अशी असेल कर्ज प्रक्रिया

कर्ज घेऊ इच्‍छिणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांशी संपर्क साधावा लागेल. शेतकऱ्यांची गरज, वित्तीय मार्गदर्शक तत्त्वे आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशांनुसार बँक कर्ज मंजूर करेल. बँकांच्या शाखा त्यानंतर सहामाहीत वैयक्तिक शेतकऱ्यांचे दावे त्यांच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवतील. वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यालय सर्व दाव्यांचे जिल्हावार संकलन करेल आणि ते कृषी खात्‍याकडे पाठवेल. कृषी खात्‍याचे अधिकारी रक्कम, कालावधी आदी पडताळून पाहतील आणि ऑफलाईन पद्धतीने मंजुरी आणि वितरणासाठी संबंधित जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवतील. वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यालय पुढे त्यांच्या संबंधित शाखांमध्ये रक्कम जमा करेल, असेही अधिसूचनेत म्‍हटले आहे.

कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

अल्पकालीन, दीर्घकालीन कृषी कर्जांवर व्याज अनुदान उपलब्ध.

कृषी आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी कार्ड अनिवार्य.

कृषी आणि पशुपालन शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डधारकांनाही (केसीसी) व्याज अनुदान.

पशुपालन, मत्स्यपालन उपक्रमांना कर्जासाठीची मार्गदर्शक तत्त्वे संबंधित विभाग आणि वित्तीय संस्था करणार जारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: W,W,W,W,W... 'बुमराह एक्स्प्रेस' सुसाट! आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनला टाकलं मागे

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

Pooja Naik: "नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही", आरोपी पूजा नाईकचा मोठा खुलासा; तपासाची दिशा बदलली

VIDEO: 'कॅप्टन कूल' माही की 'किंग' कोहली? हरमनप्रीत कौरचा 'फेव्हरेट' कॅप्टन कोण? दिलं 'हे' उत्तर

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात 9 जणांची टीम सामील; ढवळीकरांचं नाव घेत केला पूजाने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT