Betel Nut Crop Dainik gomantak
गोवा

Goa Betel Nut Crop : हवामान बदलाने सुपारीचे नुकसान थांबेना; शेतकरी धास्तावले

राज्य सरकारने शेतकऱ्यांना उभारी देण्याची गरज

Sumit Tambekar

गेल्या तीन वर्षात हवामाबदलामूळे सुपारी पिकाला चांगलाच तडाखा बसला आहे. 2019 पासून सुपारी पिकाला बसणारा वातावरणाचा फटका कमी होण्याऐवजी तो वाढतच आहे. यामूळे गोव्यातील शेतकरी वर्ग आता हवालदिल झाला आहे. असे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी वर्गाचा विचार करावा आणि त्यांच्यासाठी एखादी योजना आखावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

(Goa Farmers are demanding state government should provide financial assistance to betel nut crop)

सुपारी पिक नुकसानीबाबत बोलताना शेतकरी वरद सामंत म्हणाले की, पावसाळी हंगामातील वातावरणामूळे सांगे, धारबांदोडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपारी गळुन पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने याची दखल घ्यावी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिकरुपी दिलासा द्यावा जेणेकरुन शेतकरी निराश न होता त्यांना शेती लागवडसाठी प्रोत्साहन मिळेल.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसानेही बळीराजाला तडाका दिला आहे. पिकांवर अनेक औषधे फवारण्याकरुन ही सुपारी नफ्याऐवजी यातील नुकसान वाढतंच आहे. औषध फवारणी खर्च आणि वर्षातून एकदा मिळणाऱ्या पिकाचा नफा यांच्यातील ताळमेळ बसत नसल्याने तोट्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यशासनाने एखादी योजना सुरु करत त्याद्वारे शेतकऱ्यांना अर्थिक मदत करावी असे आवाहन सावंत यांनी सर्व शेतकऱ्यांच्यावतीने राज्यशासनाला केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT