Dabolim Airport: विमानतळ प्राधिकरणाने आयातदारांना गोदामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या लॉजिस्टिक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संचालकांना निवेदन
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

विमानतळावरील सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे कामकाज बंद होणार असल्याने एअर कार्गोच्या संबंधितांसमोर समस्या उभ्या राहणार आहेत. याप्रकरणी योग्य तोडगा काढण्यात यावा यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या लॉजिस्टिक समितीच्या पदाधिकारयांनी दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) संचालक एस.व्ही.टी धनंजय राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

आयात मालांची साठवण करण्यासाठी गोव्यातील आयातदार विमानतळावरील सेट्रल वेअरहाऊसिंग कॉपोरेशनाची सेवेचा वापर करीत होते. परंतू आता सेट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनाची सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे एअर कार्गोची साठवण कोठे करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. एअर कार्गोची साठवण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही, त्यामुळे संबधितांची अडचण होणार आहे.

Dabolim Airport
ATS Mock Drill: दहशतवाद विरोधी पथकाचे वागातोर येथे रात्रीचे मॉक ड्रिल

याप्रकरणी विमानतळ संचालक राव यांचे लक्ष वेधण्यासाठी लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस, सह अध्यक्ष धीरेंद्र ठक्कर, संचालक किरण बाळ्ळीकर, मारिया फुर्तादो, समन्वयक संकेत कासकर, डिगोसोल कंपनीचे प्रतिनिधी इत्यादीचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांच्यासमोर समस्या मांडण्यत आल्या. गोवा विमानतळ प्राधिकरणाने आयातदारांना गोदामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून संबंधितांना त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे सुरु ठेवण्यास मदत होईल.

राव यांनी शिष्टमंडळाने चालविलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सीमा शुल्क विभागाला निर्यात माल ठेवण्यासाठी 34 चौरस मीटर क्षेत्रफळ तसेच गोदामासाठी शंभर चौरस मीटर क्षेत्रफळ देण्यात यावे यासाठी प्राधिकरणाने अर्ज केला आहे. त्यासंबंधी पाठपुरावा करण्यात येईल. भविष्यात अधिक जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले जाईल. सध्या एअर इंडिया कार्गोसाठी (Air India Cargo) जागा देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासंबंधी योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन राव यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com