Goa farm land protection bill Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'तो विकास नसून राज्‍यातील गावांचा विनाश'! सरदेसाई कडाडले; फर्दिन रिबेलोंचे विधेयक मांडणार अधिवेशनात

Ferdino Rebello farm land bill: माजी न्‍यायमूर्ती रिबेलो यांनी राज्‍यातील शेतजमिनी वाचवण्‍यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून लढा सुरू केलेला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील शेतजमिनींचे संरक्षण करण्‍याच्‍या उद्देशाने ‘इनफ इज इनफ’ या चळवळीद्वारे माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी तयार केलेले शेत जमीन संरक्षण विधेयक आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी येत्‍या ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात सादर केले आहे.

माजी न्‍यायमूर्ती रिबेलो यांनी राज्‍यातील शेतजमिनी वाचवण्‍यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून लढा सुरू केलेला आहे. भू–रुपांतर रोखण्‍यासाठी त्‍यांनी नगरनियोजन कायद्याच्‍या (टीसीपी) कलम ३९ ‘अ’ला विरोध करीत, त्‍यासंदर्भात राज्‍यभर जागृती सुरू केली असून, याबाबत त्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती.

त्‍यानंतर त्‍यांनी शेत जमीन संरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करून तो विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यासह सर्वच विरोधी आमदारांनाही सादर केला. रिबेलो यांनी तयार केलेल्‍या विधेयकात प्रादेशिक आराखडा २०२१ मधील ५२६ चौरस किमी सेटलमेंट झोनच्या बाहेर नवीन परवानग्यांवर पूर्ण बंदी आणावी,

२५ टक्क्यांपर्यंत उतार असलेले डोंगर कापण्यासाठी ‘सार्वजनिक हिताचे’ लेखी कारण देणे सक्तीचे असावे, ‘टीसीपी’ कायद्याचे कलम ३९ ‘अ’ आणि जमीन महसूल कोडचे कलम ३२ (१) रद्द करण्यात यावे, असे मुद्दे या विधेयकात आहेत.

माजी न्‍यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी शेत जमीन संरक्षण विधेयकाचा मसुदा आपल्‍याला पाठवलेला होता. हे विधेयक आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मांडले आहे. सध्‍या राज्‍यातील जमिनींसंदर्भात जे सुरू आहे, तो विकास नसून राज्‍यातील गावांचा विनाश आहे. गोव्याच्या अस्मितेवर मूक हल्ला आहे.

– विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT