Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updade: पुढील पाच दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता

राज्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरली

Sumit Tambekar

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र पुढील पाच दिवस राज्यात तुरळक तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या 24 तासात राज्यात केवळ 3.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

(Goa expects LIGHT to MODERATE Rain at MANY PLACES by August end)

वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात 27 आणि 28 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 29 तारखेला अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस गडगडाटसह बरसण्याची शक्यता आहे. तसेच 30 आणि 31 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी गडगडाट पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसांमूळे डोंगर भागात असलेल्या खरीप पिके पाण्याअभावी सूकत असल्याचं चित्र आहे. तसेच भाता सारखी पिके आता पोटरीला आली असल्याने भात फोल जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पावसाने हजेरी लावत दिलासा देणे आवश्यक आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आत्तापर्यंत 102 इंच पाऊस बरसण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93.14 इंच पावसाची नोंद झाली आहे. जो सरासरी पावसाच्या तुलनेत - 8.9 टक्क्यांनी कमी आहे. त्यामूळे सध्या राज्यातील धरणे पुर्ण क्षमतेने भरली असली तरी खरीप पिकांची स्थिती पाहता पावसाने हजेरी लावणे आवश्यक बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT