राज्यातील सातही धरणे पूर्ण क्षमतेने भरली

पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार
Dams in Goa
Dams in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवेकरांना पाणीपुरवठा करणारी सात ही धरणे भरली आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने दिली आहे. यामूळे राज्यातील यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामूळे राज्याला ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अभाव न जाणवता योग्य नियोजनाने गोवेकरांना पाण्याचा गारवा कायम राहणार आहे.

(All seven dams in Goa state were filled to capacity )

Dams in Goa
Goa Tourism : पर्यटन प्रकल्पांची कामे 2017 पासून प्रलंबित

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. यापैकी साळवली धरण 103.5 टक्के भरले आहे, तर अंजुणे धरण 94.6 टक्के भरले आहे. यानंतर राज्यात पावसाचा तडाका कायम राहिल्यास पाणी आणखी वाढू शकते. ज्याच्यामूळे धरणातून पाण्याचा प्रवाह वाढवावा लागणार आहे. असे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले.

Dams in Goa
Goa Congress : ‘वाढत्या महागाईवर नियंत्रण आणा’; काँग्रेस आक्रमक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसात आतापर्यंत 8.4 टक्के घट झाली असली तरी राज्यातील धरणे भरून वाहत आहेत. यावर्षी आतापर्यंत 101.57 टक्के पाऊस अपेक्षित होता. मात्र,केवळ 93.2 टक्केच पाऊस झाला आहे. पावसाळ्याला अजून दीड महिना बाकी आहे. या काळात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.

साळवली आणि अंजुणे धरणांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी केला जातो. ही दोन्ही धरणे ओसंडून वाहत असल्याने भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाकडून धरणाच्या पाण्याची पातळी दररोज मोजली जाते. यामूळे राज्यातील पाणी पातळीवर कायम लक्ष असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com