Excise department raids continue Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Department: पेडणे घोटाळ्यानंतर अबकारी खाते अ‍ॅक्शनमोडवर; 'एवढ्या' मद्यालयांचे परवाने केले रद्द

एका बारला ठोकले टाळे : अबकारी खात्याची धडक मोहीम; जूनमध्ये 15 मद्यालयांची तपासणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Excise Department अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे खाते अधिक सक्रिय झाले आहे. ज्या मद्यालयांनी परवाने शुल्क जमा केलेले नाही, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

जून महिन्यात 15 मद्यालयांच्या तपासणीत 5 जणांचे परवाने निलंबित केले, तर मद्यविक्रीच्या गैरप्रकाराबद्दल एक मद्यालय सील केल्याची माहिती अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी दिली.

गेल्या महिन्यात खात्याच्या अंमलबजावणी पथकाने केलेल्या तपासणीत ज्या मद्यालय मालकांकडे मद्य खरेदीची बिले तसेच वाहतूक परवाना नव्हता, त्यांची दारू जप्त करून परवाने निलंबित करण्याचा इशारा खात्याने दिला होता.

त्यांना हे शुल्क जमा करण्यासाठी मुदतही दिली होती. तरीही त्यांनी ते शुल्क जमा केले नाही. त्यामुळे या पथकामार्फत मद्यालयांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. महिन्यात 15 मद्यालयांची तपासणी केली.

त्यातील 5 जणांचे शुल्क न जमा केल्याप्रकरणी परवाने निलंबित केले आहेत. एका मद्यालयात मद्य विक्रीसंदर्भात गैरव्यवहार आढळून आल्याने त्या मद्यालयाला सील ठोकले आहे, असे गाड म्हणाले.

दस्तऐवजांची होणार छाननी

राज्यात सुमारे दहा हजारांहून अधिक मद्यालयांना खात्याने परवाने दिले आहेत. अधिकांश मद्यालये ही शहरी तसेच किनारपट्टी भागात आहेत. या सर्वांचीच तपासणी करण्याची मोहीम अंमलबजावणी पथकाने सुरू केली आहे. मद्यालयांच्या सर्व दस्ताऐवजांची तपासणी केली जात आहे, असे आयुक्त नारायण गाड यांनी सांगितले.

‘त्यांच्या’वरही कारवाई

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 च्या दुरुस्तीनुसार मद्यविक्रीचे परवाने भाडेतत्त्वावर देता येतात किंवा इतरांना देता येतात. मात्र, परवाने घेणाऱ्यांना मूळ परवाना शुल्काच्या 20 टक्के रक्कम खात्याला देणे सक्तीचे आहे.

तरीही काही मद्यालये भाड्याने चालवत असलेल्या काहीजणांनी 20 टक्के रक्कम खात्याकडे जमा केलेली नाही. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT