CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Scam : अबकारी घोटाळा दक्षता खात्याकडे : मुख्यमंत्री

कडक कारवाईचे संकेत

दैनिक गोमन्तक

Goa Excise Department Scam: दैनिक ‘गोमन्तक’ने उघड केलेला अबकारी खात्यातील घोटाळा सध्या हिमनगाच्या टोकासारखा आहे. अनेक जणांच्या तक्रारी खात्याकडे येतच असून सरकारने आता हा घोटाळा दक्षता खात्याकडून चौकशी करून आवश्‍यकता भासल्यास हे प्रकरण भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पेडणे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होेते. यावेळी सावंत म्हणाले की, या घोटाळ्यासंदर्भात खात्यांतर्गत चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार अव्वल कारकून हरिश नाईक याच्यासह अबकारी खात्यातील निरीक्षक दुर्गेश नाईक आणि विभूती शेट्ये यांना बडतर्फ केले आहे.

याशिवाय संबंधितांकडून मूळ रक्कम १८ लाख आणि व्याजासह दंड म्हणून १० लाख रुपये, असे २८ लाख रुपये वसूल केले आहेत. आवश्‍यकता भासल्यास हे प्रकरण दक्षता खात्याकडे वा भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे सोपवण्यात येईल. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गृहखाते संशयाच्या घेऱ्यात

मुख्यमंत्री हे गृह खात्यासह अबकारी खातेही सांभाळतात. त्यामुळे गृह खात्याच्या साहाय्याने अबकारी खात्याच्या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी ते सहजपणे करू शकतात. असे असताना संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या कृतिशून्य मौनावर प्रश्‍न उपस्थित केला आहे.

विरोधक आक्रमक

मद्य विक्री परवाना नूतनीकरणातून व्यावसायिकांनी अबकारी खात्याला सुमारे दोन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप कॉंग्रेसच्या संजय बर्डे यांनी केला असून आयुक्त नारायण गाड व संबंधित दोषींविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणाला आक्रमकता आली असून संशयितांनी इतर मार्गांनीही पैसे मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT