Sopo Tax : म्हापशात सोपोकर वाढविल्यामुळे विक्रेत्यांचा नगराध्यक्षांना घेराव

सोपो कर कमी करण्याची मागणी
Sopo Tax
Sopo TaxDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा पालिका मार्केटातील भाजी, मडकी, फळफळावळ, फुल, केळी विक्रेत्यांनी म्हापसा पालिकेमध्ये आज सकाळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला. व्यापाऱ्यांनी वाढीव सोपोकरांबाबत जाब विचारून नाराजी व्यक्त केली.या विक्रेते म्हणाले, गेल्या एक जुलैपासून वाढवलेला हा सोपोकर वाढवण्याचे कारण काय? आणि सदरचा सोपो वाढवण्यापूर्वी आम्हांला त्यासंबंधीची माहिती दिलेली नाही.

सध्या बाजारामध्ये आम्हांला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही पालिकेने कर वाढविला आहे. यावेळी भाजी, मडकी, फळ-फळावली, फुले, केळी िवक्रेते आहेत. यांच्या अडचणी लक्षात घेऊन सोपो कर कमी करावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. नगराध्यक्ष प्रिया मिशाळ म्हणाल्या, गेल्या आठवड्यामध्ये या सोपोकर संबंधित पालिका मंडळाच्या बैठकीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

Sopo Tax
Goa News - गणेशोत्सवासाठी यंदा जादा गाड्या | Gomantak TV

या सुधारणा करतेवेळी जो सोपो वाढवलेला होता, तो कमी करून घेतलेला आहे. 30 रुपयावरून 25 रुपये 40 रुपयांवरून 30 रुपये अशा पद्धतीचा सोपो दर ठेवण्यात आलेला आहे. हा कर एक एप्रिलपासून तुमच्याकडून वसूल करण्यात येणार होता, पण काही कारणास्तव तो एक जुलैपासून वसूल करण्यात येत आहे. या काळामध्ये दोन महिन्यात तुम्हांला सूट देण्यात आलेली आहे. तरीसुद्धा हा प्रश्‍न पालिका मंडळाकडे चर्चा करून सोडविला जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

Sopo Tax
Goa News - आकूर - पावसाळ्यातील एक स्वादिष्ट पदार्थ | Akur - a seasonal delicacy | Gomantak TV

भरमसाट सोपो नाही!

उपनगराध्यक्ष विराज फडके म्हणाले,आम्ही भरमसाट सोपो वाढवलेला नाही. नियमानुसार प्रति चौरसमीटर 5 रुपये आणि कचरा कर 5 रुपये अशी वाढ केली आहे. तरीही विक्रेत्यांना अयोग्य वाटत असल्यास त्यांनी तसा रीतसर अर्ज करावा. तो अर्ज पालिका मंडळासमोर ठेवला जाईल. तिथे जे ठरेल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com