Goa | Abhay Bang Dainik Gomantak
गोवा

Goa: माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर पर्यावरण रक्षण शक्य- अभय बंग

Goa: पूर्वजांनी जे संचित आपल्याला प्रदान केले त्याचे जतन करायला हवे.

दैनिक गोमन्तक

Goa: महात्मा गांधीजींचे पर्यावरणासंबंधीचे विचार दूरदृष्टीचे होते, याची आज प्रचीती येते. माणसाची हाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर पर्यावरण रक्षण करणे शक्य आहे. कर्तव्यभावना मनात जागवून प्रत्येकाने त्या मार्गाने कार्य करायला हवे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले.

ढवळी येथील लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या सभागृहात काल शनिवारी निर्मल विश्‍व आणि लोकविश्‍वास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध वास्तुविशारद कमलाकर साधले यांनी लिहिलेल्या ‘सृष्टिधर्म’ पुस्तकाचे प्रकाशन दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्वीच्या आणि आताच्या गोव्यात फरक

राजू नायक म्हणाले, पूर्वजांनी जे संचित आपल्याला प्रदान केले त्याचे जतन करायला हवे. खाणींमुळे उद्ध्वस्त झालेला गोवा आज आपल्याला दिसतो आहे. करोडो रुपयांचा खनिज माल निर्यात झाला; पण गोव्यासाठी निधी मात्र तुटपुंजा मिळाला, त्याकडे राजकारण्यांनी लक्षच दिले नाही. गोव्याचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पारतंत्र्यातील गोवा आणि मुक्तीनंतरचा गोवा यात मोठा फरक आहे.

अनेक गोष्टींवर प्रकाश!

‘सृष्टिधर्म’ पुस्तक प्रकाशनावेळी चर्चा संकलनातून खूप चांगली माहिती उपलब्ध झाली. ललिता जोशी यांनी चर्चा संकलनात सृष्टीवरील अत्याचार आणि त्यावरील उपाय यासंबंधी विवेचन करताना सर्वांना बोलते केले. यावेळी पर्यावरणप्रेमी क्लॉड अल्वारिस, प्रसिद्ध साहित्यिक सोमनाथ कोमरपंत यांच्यासह इतर क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclubs: 25 जणांच्या मृत्यूचे सावट, तरीही सील केलेले नाईट क्लब पुन्हा सुरू; दोन आठवड्यांत परवाने कसे मिळाले?

Bicholim River Front: ‘रिव्हर फ्रंट’चे सौंदर्यीकरण हरवतेय! डिचोलीत अस्तित्वासाठी संघर्ष; देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Siolim Jagor Jatra: "सगळे देवू एकूच..."! मध्यरात्री सगळे ‘दांडो’ वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळतात; शिवोलीचा जागोर

Goa Live News: सांडपाण्यामुळे खारफुटीचा ऱ्हास; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर गंभीर आरोप

अग्रलेख: ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल! सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना..

SCROLL FOR NEXT