Goa Shack Fire : कळंगुट समुद्रकिनारी असलेल्या शॅकला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Goa Shack Fire : कळंगुट येथील सावतावाडो येथे आज दुपारी समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग लागली.
Goa Shack Fire News
Goa Shack Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील सावतावाडो येथे आज दुपारी समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी पिळर्णे येथील अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. ही घटना घडली तेव्हा पर्यटक शॅकमध्ये बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीत 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

(Goa Shack Fire News)

Goa Shack Fire News
Vijai Sardesai: सरकारला गोवेकरांपेक्षा ओला, उबरची जास्त काळजी

दुसरीकडे, काणका येथील ‘कासा मार्किस’ या फर्निचर शोरूमला आज शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. ही आग लागल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हापसा अग्निशमन दलाने म्हटले आहे. हे आस्थापन माजी सरपंच मिल्टन मार्किस यांच्या मालकीचे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर घटना ही शनिवारी (ता. 8 ऑक्टोबर) सकाळी 8 च्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीत शोरूममधील किंमतीचे सोफासेट, कपाट, फर्निचर, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड तसेच गाद्या, बाथटब यासह किंमती साहित्य जळून खाक झाले. हे शोरुम तळमजला आणि पोटमजल्यावर पसरलेले असून फक्त तळमजल्यावर आगीने पेट घेतला. या आगीमुळे आस्थापनात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com