आम आदमी पक्षाने या प्रकल्पाबाबत सरकारने आणि स्थानिक आमदाराने स्थानिकांना सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली . Dainik Gomantak
गोवा

Goa: मोपा परिसरातील इंटटेटमेंट झोन कुणासाठी : आपचा सवाल

स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर सरकारी जागेत मनोरंजन ग्राम करण्याची घोषणा केली आहे . तो प्रकल्प नक्की कुणासाठी , त्यात काय काय उपलब्ध असणार व त्याचा स्थानिकांना काय फायदा होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: इंटरटेटमेंट (Entertainment) व्हिलेज म्हणजे नक्की कसला प्रकल्प ,आणि मोपा (Mopa) विमानतळ परिसरातही मनोरंजनात्मक झोन (Zone) म्हणून सरकारने जाहीर केले दोन्ही प्रकल्प नेमके कुणासाठी ,आणि त्यातून स्थानिकाना काय फायदा असा सवाल मांद्रे आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जुनसवाडा मांद्रे येथील सरकारी जागेत नियोजित मनोरंजन व्हिलेज होणार आहे त्या जागेत ४ रोजी आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती ,लोकांचे मनोरंजनच करणार कि मुलभूत गरजा पुरवून विकास करणार असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित करून सरकारने आणि स्थानिक आमदाराने स्थानिकाना सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली .

यावेळी आम आदमी पक्षाचे मांद्रेचे नेते वकील प्रसाद शहापूरकर , निलेश मांद्रेकर पुंडलिक धारगळकर ,कृष्णा राऊत , पूजा ठाकूर व शरद तोरस्कर उपस्थित होते .

प्रसाद शहापूरकर

आम आदमी पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी बोलताना सरकारने किंवा आमदाराने स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर सरकारी जागेत मनोरंजन ग्राम करण्याची घोषणा केली आहे . तो प्रकल्प नक्की कुणासाठी , त्यात काय काय उपलब्ध असणार व त्याचा स्थानिकाना काय फायदा होईल असा प्रश्न उपस्थित केला .

हा प्रकल्प म्हणजे काय आहे , लोकाना विश्वासात घेवून घोषणा करायला हवी होती , आम्ही कुठल्या रोजगार निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात नाही ,मात्र हा प्रकल्प सरकार आमच्यावर लादत आहे , त्याला आमचा विरोध असल्याचे शहापूरकर म्हणाले . प्रकल्पाची व्याख्या काय , नेमका प्रकल्प कसला ,याची माहिती कुणालाच नाही . याच जागेत २००० साली आयटी प्रकल्प होवू घातला होता त्याला चालना नाही .

स्थानिकांना आरोग्य पाणी नोकऱ्या या समस्या सतत भेडसावत आहे त्यावर उपाय योजना सरकारने अगोदर करावी अशी मागणी शहापूरकर यांनी केली . निवडणुका जाहीर होताच अश्या प्रकल्पांची पायाभरणी करणे कितपत योग्य आहे त्यापेक्षा अर्धवट प्रकल्प पूर्ण करावे असे शहापूरकर म्हणाले . कोरोना काळात आरोग्य सुविधा नाही , लोकांचे हाल झाले , पर्यटकाना ज्या मुलभूत गरजा लागतात त्याच पूर्ण केल्या नाहीत आणि नवीन प्रकल्प कश्यासाठी असा प्रश्न प्रसाद शहापूरकर यांनी उपस्थित केला .

त्यापेक्षा कला भवन उभारा

या भागातील कलाकारांनी कला भवन उभारण्याची मागणी केली , मात्र आज पर्यंत त्याला चालना मिळाली नाही , त्यापेक्षा या ठिकाणी कला भवन उभारावे अशी मागणी केली . पर्यटनाच्या नजरेतून गावात मनोरंजन सिटी चा प्रस्ताव सरकारने ठेवला किंवा त्याला मंजुत्री दिली त्याची सविस्तर अगोदर माहिती द्यावी अशी मागणी शहापूरकर यांनी केली .

स्थानिक पंचायतीलाही या विषयी काहीच कल्पना नाही .आता आम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल असे ते म्हणाले . गाव उधवस्त करून जर प्रकल्प होत असेल तर त्याला विरोध असेल अस ठणकावून सांगितले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

Horoscope: दिवाळीच्या काळात राजयोगाची संधी, 'या' राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा; ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरणार फलदायी

SCROLL FOR NEXT