Goa Employee Marital Data Dainik Gomantak
गोवा

Goa Employee Marital Data: 12,907 कर्मचारी 'शुभमंगल' विना; नियोजन, सांख्‍यिकी मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर

Goa government employees data: राज्‍यातील सरकारी खाती, अनुदानप्राप्‍त संस्‍था, महामंडळे आणि स्‍वायत्त संस्‍थांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या एकूण ६३,९७० पैकी १२,९०७ जणांचे अद्याप ‘शुभमंगलम सावधान’ झालेले नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यातील सरकारी खाती, अनुदानप्राप्‍त संस्‍था, महामंडळे आणि स्‍वायत्त संस्‍थांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या एकूण ६३,९७० पैकी १२,९०७ जणांचे अद्याप ‘शुभमंगलम सावधान’ झालेले नाही. तर, ५१,०५५ कर्मचारी विवाहित असून, ८ जणांनी आपल्‍या विवाहासंदर्भातील माहिती सरकारला दिलेली नाही.

नियोजन, सांख्‍यिकी आणि मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सरकारी खात्‍यांमध्‍ये सर्वाधिक ९,०२८ कर्मचारी अविवाहित आहेत. त्‍यानंतर या यादीत अनुदानप्राप्‍त संस्‍थांचा क्रमांक लागत असून, त्‍यांमध्‍ये २,९७७ जणांचा विवाह झालेला नाही.

विविध महामंडळांत काम करीत असलेल्‍या ६७२ आणि स्‍वायत्त संस्‍थांमधील २३० जणांचा अद्याप विवाह झालेला नाही. सरकारी खात्‍यांतील २, अनुदानप्राप्‍त संस्‍थांमधील ५ आणि महामंडळांतील एक अशा एकूण ८ जणांनी आपला विवाह झालेला आहे की नाही, याची माहिती सरकारला दिलेली नाही, असे या आकडेवारीतून दिसून येते.

५,४०८ कर्मचारी कंत्राटी, अर्धवेळ पद्धतीवर

राज्‍यातील सरकारी खाती, अनुदानप्राप्‍त संस्‍था, महामंडळे आणि स्‍वायत्त संस्‍थांमध्‍ये एकूण ५,४०८ कर्मचारी कंत्राटी, अर्धवेळ पद्धतीवर काम करीत आहेत.

सरकारी खात्‍यांमध्‍ये ६३४ पुरुष आणि ७७७ महिला, अनुदानप्राप्‍त संस्‍थांमध्‍ये १,४३४ पुरुष आणि १,४४० महिला, महामंडळांमध्‍ये ८३५ पुरुष आणि २०४ महिला, तर स्‍वायत्त संस्‍थांमध्‍ये ३२ पुरुष आणि ५२ महिला कंत्राटी तसेच अर्धवेळ पद्धतीवर काम करीत असल्‍याचे अहवालातून दिसून येते.

विवाहित, अविवाहित कर्मचारी

खाती विवाहित अविवाहित न सांगितलेले एकूण कर्मचारी

सरकारी ३४,८९१ ९,०२८ २ ४३,९२१

अनुदानप्राप्‍त संस्‍था १२,८४७ २,९७७ ५ १५,८२९

महामंडळे २,६९९ ६७२ १ ३,३७२

स्‍वायत्त संस्‍था ६१८ २३० ० ८४८

एकूण ५१,०५५ १२,९०७ ८ ६३,९७०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Closure: दाबोळी-वेर्णा वाहतूक वळविली, 29 पासून कार्यवाही; कुठ्ठाळी-चिखली महामार्गावरून अवजड वाहतूक

Horoscope: तुमचे प्रेम संबंध होणार मजबूत! 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस आहे 'रोमान्स'ने भरलेला

Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

Betul Port Project: बेतुलात बंदर प्रकल्प नकोच! कॉंग्रेस, फॉरवर्डचे एकमत; 'एमपीए'च्या उपक्रमाला स्थानिकांतून विरोध

Smriti Mandhana Wedding: आधी वडिलांना हृदयविकाराचा झटका, आता होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT