Margao: देशातील विविध सांस्कृतिक आणि सांगीतिक (Art & Musical) संपदा देशासमोर आणण्यासाठी नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीने (Music Drama Academy) आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या रंग स्वाधीनता सांस्कृतिक महोत्सवाची (Rang Swadhinta Art Festival) सांगता उद्या गोव्याचे प्रसिद्ध मांडो कलाकार एल्विस गोईस (Goa's Mando Artist Elvis) यांच्या मांडो गायनाने (Mando Singing) होणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हा व्हर्चुअल संगीत महोत्सव (Virtual Music Festival) आयोजित करण्यात आला होता. 15 तारखेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात आता पर्यंत अनेक नावाजलेल्या कालाकारांनी आपली कला पेश केली.
उद्या 17 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता गोईस यांचा कार्यक्रम संगीत नाटक अकादमीच्या युट्यूब व फेसबुक वरून लाईव्ह प्रसारित केला जाणार असून केपेची कीर्णा या संस्थेच्या साथी कलाकारांच्या साथीने ते मांडो सादर करणार आहेत. त्यापूर्वी सायंकाळी 6.30वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व तामिळनाडूचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 15 रोजी ' दिल की आवाज- इंडिया' हे गीत सादर केलेल्या एल्विस गोईस याना मांडो प्रिन्स ऑफ गोवा म्हणून ओळखले जाते. उद्याच्या या कार्यक्रमामुळे गोव्याचे हे लोकसंगीत सर्व देशासमोर येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.