Sudin Dhavalikar On Goa Electricity Issue : सध्या गोव्यात वीज निर्मिती होत नाही. लवकरच गोवा राज्य स्वतःहून वीज निर्मिती सुरू करेल. आम्ही 1200 कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे राज्यातील वीज समस्या सुटतील. मुख्यमंत्री डॉ. सावंत याच्या नेतृत्वाखालील सरकारवर गोव्यातील जनतेने विश्वास ठेवावा. येत्या अडीच वर्षांनंतर गोव्यातील वीज समस्या पुर्णपणे सुटतील असे आश्वासन वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली. यावेळी त्यांनी वीज खात्यामार्फत सुरु असलेल्या व पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.
ढवळीकर म्हणाले, "मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला आहे तसाच येत्या दोन वर्षात गोव्यातील वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवणार आहे. वेर्णा सबस्टेशनच्या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी 350 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या असून येत्या 15 दिवसांत निविदेच्या फाईलला मंजूरी मिळेत. लवकरच सबस्टेशन अपग्रेडेशन केली जातील."
"औद्योगिक वसाहतीला जाणाऱ्या वीजवाहिन्यांत कमीजास्त दाबाचा प्रश्न 65 एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची उभारणी केल्यानंतर सुटेल. कुंकळ्ळी सबस्टेशन अपग्रेडेशनसाठी घेतले आहे. काणकोण भागात 200 कोटींची भूमिगत वीजवाहिन्यांची कामे हाती घेतली आहेत. जास्त सबस्टेशनची ज्याठिकाणी आवश्यकता असतेल त्याठिकाणी सबस्टेशन उभारली जातील."
"350 कोटींचे वेर्णा सबस्टेशनची निविदा काढण्यात आली आहे तसेच साळगाव सबस्टेशनची 200 कोटींची निविदा पुढील महिन्यांत काढण्यात येईल. अनेक सबस्टेशनला फेसिंग न्हवते ती कामे करण्यासाठी दोन कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पुढील अडीच वर्षात गोव्यातील वीज समस्या सुटतील." असे ढवळीकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.