Electricity  Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Meter: मुदत संपली! गोव्यात वीज खाते करणार धडक कारवाई; सोयीच्या ठिकाणी मीटर लावण्याचा विषय ऐरणीवर

Goa Electricity Meter: वीज खात्याचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी सांगितले की, काही ग्राहकांचे मीटर घरात असल्याने जेव्हा मीटर रिडर बिलांसाठी रिडिंग घेण्यासाठी येतात, तेव्हा घरे बंद असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अडचणीच्या ठिकाणी असलेले मीटर काढून सोयीच्या ठिकाणी लावण्यासाठी वीज खात्याने काढलेल्या नोटिशीची मुदत संपली आहे. त्यामुळे शनिवारपासून वीज खाते इशारा दिल्यानुसार कारवाई करणार असल्याचे खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

वीज खात्याचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी सांगितले की, काही ग्राहकांचे मीटर घरात असल्याने जेव्हा मीटर रिडर बिलांसाठी रिडिंग घेण्यासाठी येतात, तेव्हा घरे बंद असतात. त्यामुळे रिडिंगसाठी कर्मचाऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात.

काहीवेळा मीटर बऱ्याच उंच ठिकाणी बसवलेले असते. त्यामुळे त्याचे रिडिंग घेणे जिकिरीचे होते. काहीवेळा ते घेताही येत नाही. त्यासाठीच वीज खात्याने मीटर स्थलांतर करण्याची नोटीस ग्राहकांना दिली होती, म्हणजेच त्यांना सूचित केले होते. सहा महिन्यांची मुदत आज २८ रोजी संपते. त्यामुळे या नोटिशीनुसार कारवाई सुरू होईल.

नोटिशीला ३५ टक्केच ग्राहकांचा प्रतिसाद

वीज खात्याच्या नोटिशीनुसार केवळ ३५ टक्के ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. म्हणजेच ६५ टक्के ग्राहकांचे मीटर हे घराच्या आत वा अडचणीच्या ठिकाणी असावेत. अडचणीच्या ठिकाणच्या १२ हजार मीटरचे स्थलांतरण आधीच केले आहे. मात्र तसे ३८ हजार घरगुती मीटर असल्याची माहिती खात्याकडे आहे. ज्यांनी मीटर स्थलांतरित केले नाही, त्यांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई खाते सुरू करेल, असेही हेदे यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT