वीजबील थकबाकीदारांना थकीत बिल भरण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत होती आता ही 31 मार्चपर्यंत थकबाकीदारांना वीजबील भरता येणार आहे.
त्यामुळे त्यापूर्वी वीजबील फेडावीत अशी सूचना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. (Power Minister Sudin Dhavalikar on Electricity Bills Goa)
उपलब्ध माहितीनुसार, वीज खात्याच्या विविध माध्यमातून तब्बल 350 कोटी रूपये येणे बाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे वीज खात्याच्या अडचणी वाढत आहेत. खात्याला विविध साधन सामग्री खरेदी करायची आहे. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत वीजबील भरणे अपेक्षित होते. थकबाकी फेडण्यासाठी ग्राहकांना एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता 31 मार्चपर्यंत थकबाकीदारांना वीजबील भरता येणार आहे. असे ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई तसेच, वीज कनेक्शन तोडायची का ठेवायची असा प्रश्न खात्याला पडला आहे.
वीज दरवाढ अटळ - ढवळीकर
राज्यातील वीज दरात काही प्रमाणात वाढ होणे अटळ आहे. गोव्यातील लोकांना चांगल्या दर्जाची वीज मिळावी म्हणून थोडी फार झळ ग्राहकांना सोसावीच लागेल. सरकार सौर उर्जा निर्मिती व हायड्रोजन उर्जेवर भर देत आहे. असे सांगून त्यांनी पुढील दोन वर्षांत राज्यात 150 मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उद्गिष्ट आहे. कदंब पठारावर वीज उपकेंद्राचे 25 कोटी रुपये खर्चाचे काम हाती घेतले जाणार आहे असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.