Digital Payment | Digital payments without the internet Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity : गोव्यात क्यूआर कोडद्वारे घरबसल्या बिल भरा

वीज खात्याची सुविधा : ग्राहकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

दैनिक गोमन्तक

Goa Electricity Bill : राज्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी विद्युत खात्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली असून, 93 टक्के ग्राहक बिल भरण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या दृष्टीने खात्याने डायनामिक क्यूआर कोड सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांच्या वीज बिलांवर हा क्यूआर कोड असणार आहे. तो स्कॅन केल्‍यानंतर थेट एकूण शुल्क भरता येईल, अशी माहिती वीज खात्‍याने ‘गोमन्तक’ला दिली आहे.

डायनानिक क्यूआर कोड म्हणजे काय?

क्यूआर कोड हा मोबाईलद्वारे स्कॅन करता येणारा असा कोड आहे. यूपीआई ॲपचा वापर करून पैसे भरण्यासाठी तो वापरला जातो. दुकानांवर, पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणी क्यूआर लावलेले दिसतात. विद्युत खात्याचा क्यूआर कोड हा डायनामिक असणार असून, बिलाची रक्कम आणि ग्राहकानुसार तो असणार आहे. त्यामुळे बनवाट क्यूआर कोड करून लोकांना लुबाडण्याचा धोका निर्माण होण्याचा प्रश्‍न येत नाही. 100 रुपयांपासून ते लाखपर्यंत वेगवेगळे क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत. हा क्यूआर कोड असलेली सुमारे एक लाख बिल छापली गेली आहेत. डायनामिक क्यूआर कोड प्रणाली सुरू करणारे गोवा हे दुसरे राज्य आहे. ही सुविधा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.

क्यूआर कोड प्रणालीचे फायदे कोणते?

ऑनलाईन, नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड या माध्यमांद्वारे बिल भरता येते. परंतु यात ग्राहकांना आपला बिल खात्याचा क्रमांक, सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर बिल भरता येते. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी डायनामिक क्यूआर कोड सुविधा आणली आहे. कोड एकदा स्कॅन केल्यानंतर बँक खात्याशी जोडलेले यूपीआय ॲप उघडून त्यावर ग्राहकाचे नाव, बिल खाते क्रमांक आणि शुल्क येते. त्याद्वारे थेट बिल भरता येणार आहे. त्यासाठी तीन गोष्टी अत्यावश्‍यक आहेत, त्या म्हणजे स्मार्टफोन, यूपीआय ॲप आणि बँक खात्यात पैसे. या तिन्ही गोष्टी असल्यास घरबसल्या जास्‍त त्रास न घेता बिल भरता येणार आहे. क्यूआर कोडमुळे वेळची वाचणार आहे. लोकांना बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्‍यकता नाही.

डिजिल पेमेंटमध्ये गोवा कितव्या स्थानी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया मोहीम राबवल्‍यानंतर देशात पैसे भरण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. गोव्यात विद्युत खात्याने 2011 पासून डिजिटल माध्यमाने बिल भरण्याच्‍या दिशेने काम सुरू केले होते. तेव्हा 0.5 टक्के ग्राहक या सुविधेचा लाभ घेत होते. सध्या खात्‍याचे 6.83 लाख ग्राहक असून, डिजिटल आकडा 93 टक्‍के झाला आहे.2021 - 22 आर्थिक वर्षासाठी डिजिटल पेमेंटमध्ये देशात गोवा दुसऱ्या स्थानी आहे. मणिपूरने पहिले स्थान मिळवले असल्याची माहिती विद्युत खात्याने दिली आहे.

फसवणूक करणाऱ्या मॅसेजपासून सावध रहा!

विद्युत खात्याकडून वीज जोडणी कापणीसंदर्भात कुठल्याही प्रकारचा मॅसेज पाठवला जात नाही. जोडणी कापली जाईल, त्यासाठी विशेष क्रमांक किंवा लिंकवर जाऊन पैसे भरावेत, असे मॅसेज लोकांना येतात. या फसवणूक करणाऱ्यांकडून सावध राहण्याची आवश्‍कता आहे. त्यासाठी पडताळणी केल्याशिवाय पैसे किंवा आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका, असे आवाहन वीज खात्‍याने केले आहे.

बिल न भरणाऱ्यांची वीज कापणार

वीजजोडणी तोडण्‍याची मोहीम लवकरच हाती घेतली जाणार असल्याची माहिती विद्युत खात्याने दिली आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाच्या (जीईआरसी) निमयानुसार बिल आल्यानंतर 15 दिवसांची मुदत दिली जाते. त्‍या कालावधीत शुल्क भरले नाही, तर वीज तोडण्‍याचे निर्देश दिले जातात. परंतु, गोवा विद्युत खाते आपल्या ग्राहकांना दोन महिन्यांची मुदत देते. त्यानंतर देखील वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई म्‍हणून त्यांची वीजजोडणी तोडली जाईल. त्यामुळे खात्याला तोटा होत नाही तसेच शुल्कावर व्याज लागून रक्कमही वाढत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT