पणजी: राज्यात ई-बाईकच्या संख्येत घट होत असून, चारचाकींमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा वर्षांच्या काळात राज्यात ३०,५४६ दुचाकी आणि ४,४२८ चारचाकी मिळून एकूण ३४,९७४ ई-वाहनांची नोंदणी झाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून समोर आले आहे.
ईलेक्ट्रीक वाहने वापरण्यास सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच २०२० मध्ये राज्यात अवघ्या ५५ दुचाकी आणि २५ चारचाकींची नोंदणी झालेली होती. त्यानंतर २०२४ पर्यंत दुचाकींच्या संख्येत वाढ झाली. पण, २०२५ मध्ये ही संख्या घटली आहे. तर, चारचाकींची संख्या मात्र प्रत्येकवर्षी वाढत गेल्याचे मंत्री गडकरी यांनी उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
दरम्यान, गोव्यासह देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत विविध प्रकारची पावले उचलली आहेत. अशा वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी, नूतनीकरणासाठी तसेच नवीन नोंदणी चिन्ह नियुक्त करण्यासाठी शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
सर्वच राज्यांमध्ये अधिकाधिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ईलेक्ट्रीक वाहनांना आग लागू नये, यासाठीही विविध मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत, असेही मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.