E-Bike: कमी हफ्ता, मोफत चार्चिंग! गोव्यातील मोटरसायकल पायलटांना ई बाईक्स देण्याचा प्रस्ताव

Goa Govt To Give E-Bikes to Pilots: प्रस्तावाला मोटरसायकल पायलटांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.
कमी हफ्ता, मोफत चार्चिंग! गोव्यातील मोटरसायकल पायलटांना ई बाईक्स देण्याचा प्रस्ताव
Goa CM Pramod Sawant With Bike PilotsDainik Gomantak

राज्यातील मोटरसायकल पायलटांना सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल बदलून ई बाईक देण्याचा सरकारचा विचार आहे. कमीतकमी हप्त्यासह पायलटांना या ई बाईक्स उपलब्ध करुन देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

एवढेच नव्हे तर बाईकसाठी चार्जिंग स्टेशनवर मोफत चार्जिंग सुविधा देण्याचा मानस देखील राज्य सरकारने या प्रस्तावात व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (दि. 27 जून) याबाबत माहिती देत, राज्यातील पायलटांसमोर हा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले. राज्यातील पायलट्सना ई बाईक्स दिल्यास त्यांचा पेट्रोलचा खर्च वाचणार आहे.

बचत झालेल्या पैशांचा वापर हप्त्यासाठी करता येईल शिवाय मिळणारा नफा आहे असा हातात राहणार आहे.

असा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोटरसायकल पायलटांसमोर ठेवला असून, या प्रस्तावाला मोटरसायकल पायलटांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळीतील निवासस्थानी राज्यातील मोटरसायकल पायलट्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर व इतर पायलटांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मोटरसायकल पायलटांच्या इतरही विषय व समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com