Mukesh Ghatwal Dainik Gomantak
गोवा

Goa: वेळगे पंचायतीच्या सरपंचपदी मुकेश घाटवळ यांची वर्णी

डिचोली (Bicholim) तालुक्यातील वेळगे पंचायतीच्या सरपंचपदाची माळ मुकेश घाटवळ (Mukesh Ghatwal) यांच्या गळ्यात पडली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली (Bicholim) तालुक्यातील वेळगे पंचायतीच्या सरपंचपदाची माळ मुकेश घाटवळ (Mukesh Ghatwal) यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्त सरपंचपदासाठी मंगळवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत श्री.घाटवळ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. अलीकडेच महेश गवंडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी मंगळवारी पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मावळते सरपंच महेश गवंडे यांच्यासह उपसरपंच उन्नती सहस्त्रबुद्धे सामंता कामत, केदार घाडी, दुर्गादास नाईक आणि गोविंद गावकर हे पंचसदस्य उपस्थित होते. सरपंच पदासाठी श्री. घाटवळ यांनी दाखल केलेला अर्ज निर्वाचन अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरून श्री. घाटवळ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने पंचायतीचा विकास करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच मुकेश घाटवळ यांनी सांगितले. सरपंच निवडणुकीवेळी अमित घाडी , सनिल प्रभू, अवधूत धोंड आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT