Elections
Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Lok Sabha Election: मतदार नावालाच ‘राजा’ खासदार वाजवतो ‘बाजा’; वर्षाला कोट्यवधींचा निधी, वाचा काय आहे प्रकार...

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Lok Sabha Election: लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि ७ मे रोजी मतदान होणार आहे. खासदार म्हणून निवडून येणाऱ्या व्यक्तीला आजन्म निवृत्ती वेतन तर मिळतेच; पण खासदारपदी असताना महिना ५० हजार रुपयांच्या वेतन व शिवाय १ लाख ५१ हजार रुपये भत्ता मिळतो.

याचा अर्थ वर्षाला १८ लाख २२ हजार रुपये केवळ भत्त्यापोटी मिळतात. आपल्या देशातील दरवर्षीचे प्रतिव्यक्ती उत्पन्न पाहिले तर ते जवळजवळ ९८ हजार ३७४ रुपये आहे.

म्हणजेच साधारणपणे प्रत्येक भारतीय वर्षभरात तेवढी रककम कमावतो. परंतु त्याच नागरिकांनी निवडलेल्या नेत्याला मात्र त्‍यांच्या वर्षाच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न दर महिन्याला मिळते.

या लोकप्रतिनिधींना वेतनाव्यतिरिक्त एवढे भत्ते मिळतात अशी कल्‍पना कोणीही केलेली नसेल. एका खासदाराला दरमहा १ लाख ४० हजार रुपये निश्चितपणे मिळतात.

ज्यावर त्यापेक्षा जास्त भत्ता दिला जातो. निश्चित वेतन आणि भत्ते जोडले तर एका खासदाराला एका महिन्याला २ लाख ९१ हजार ८३३ रुपये मिळतात.

म्हणजेच देशाला एक खासदार वार्षिक ३५ लाख रुपयांना पडतो. शिवाय या उत्पन्नावर प्राप्तीकर (इन्कमटॅक्स) भरावा लागत नाही आणि अन्य सुविधाही मोफत दिल्या जातात.

कुटुंबीयांनाही सुविधा

खासदाराच्‍या कुटुंबातील व्यक्तींनाही अनेक सुविधा दिल्या जातात. यात जोडीदारासह ३४ मोफत विमानप्रवास, अमर्याद रेल्वेप्रवास आणि संसद अधिवेशनादरम्यान घरापासून ते दिल्लीपर्यंतचे ८ विमानप्रवासही समाविष्ट आहेत.

एका खासदाराला ५० हजार युनिट मोफत वीज, १ लाख ७० हजार दूरध्वनीवरील मोफत कॉल्स, ४० लाख लिटर पाणी, राहण्यासाठी सरकारी बंगला (ज्यात सर्व फर्निचर आणि एअर कंडिशन, शिवाय त्यांची देखभाल) मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

Goa Todays Live Update: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

SCROLL FOR NEXT