Is Sanjay Raut's neglecting Shiv Sena in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Election: शिवसेनेच्या हायकमांडला गोवा उपरेच

संजय राऊत आणि गोव्यातली शिवसेना

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचे (ShivSena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गोवा शिवसेनेचे (Goa ShivSena) प्रभारी आहेत. गोव्यात विधानसभा निवडणुकांचे (Goa Assembly Elections) वारे वाहात आहेत. भाजप (BJP) व कॉंग्रेस (Congress) पक्षासोबतच शिवसेनेच्या मागून स्थापन झालेले व गोव्यात अवरतलेले पक्षही सध्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत. मात्र, शिवसेना या प्रक्रियेत कुठेच दिसत नाही. प्रभारी संजय राऊत यांनी तर गोव्यातील शिवसेनेला वाऱ्यावरच सोडले आहे. फक्त महाराष्ट्रात शिवसेनेला बळकट करताना इतर राज्यांत मात्र ती वाढावी याकडे मुंबईतील नेत्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळेच गोव्यात शिवसेना वाढली नाही, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

महाविकास आघाडीचा पॅटर्न गोव्यात चालणार का?

आधिपासून गोवा हा भाजपचा गड मानला जातो. आणि शिवसेना भाजप यांच्यात 25 वर्ष युती होती त्यामुळे शिवसेनेकडून गोव्याकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आले नाही. परंतु युती तुटल्यामुळे शिवसेना गोव्यासह देशातील इतर राज्यात आपले हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गोवा विधानसभेच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर शवसेनेची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षाचे एकत्रित सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणूकीत शिवसेना गोव्यामध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवणार का? आणि कॉंग्रेससह इतर भाजप विरोधी पक्षांना मदत करणार का? हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT