Goa Election: Goa government launches many scheme opposition attack on Goa government Dainik Gomantak
गोवा

सरकारकडून योजनांची मेजवानी, तर विरोधकांच्या आरोपांच्या फैरी

विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्य सरकार अधिक गतिमान होत आहे.

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्य सरकार अधिक गतिमान होत आहे. सरकारकडून योजनांचा धडाका लावला जात आहे. योजनांसाठी खास केंद्रीय मंत्र्यांची फौजही कामाला लागली आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय वीज राज्यमंत्री कृष्णनपाल गुर्जर हे राज्यात आहेत. मंत्री रेड्डी आणि यांनी आज दिवसभर पर्यटनाशी संबंधित अनेक योजना आणि प्रकल्पांचा शुभारंभ केला. (Goa Election: Goa government launches many scheme opposition attack on Goa government)

दुसरीकडे, सरकारला घेरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून विविध राजकीय पक्षांनी भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या.दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी, राज्यात निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार सुरू असून ८-१० कोटीत आमदार तर शंभर कोटींमध्ये मुख्यमंत्री विकत घेता येतो, असा गंभीर आरोप केला. तर तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी भ्रष्ट भाजप सरकार कोणत्याही स्तरावर जाऊन आमदार आणि नेत्यांची खरेदी-विक्री करू शकते, असे म्हणत पश्चिम बंगालमध्येही भाजपने हेच केले होते, असे म्हटले.

दुसरीकडे रिव्होल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसने सत्तरी, वाळपई आणि शिरोडा भागात प्रचार यंत्रणा उभी करण्याबरोबरच राज्यातील भाजप सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्यासाठी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.

काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ई-गतिशीलता गोलमेज परिषदेवेळी राज्याच्या ई-गतिशीलता मसुद्याची माहिती दिली. या मसुद्यात दुचाकी वाहनांसाठी 20 टक्के, तीन चाकींसाठी 40 टक्के तर चारचाकी वाहनांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदानाची तरतूद केली असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम’ या तत्त्‍वावर याचा लाभ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय हमरस्त्यावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर एक चार्जिंग स्टेशन असेल.

तर विरोधी पक्षही सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. राज्यातील जनता पूर्वीपासूनच काँग्रेसच्या बाजूने उभी आहे. मात्र, भ्रष्ट भाजप आमदार फोडण्यामध्ये गुंग आहे. काँग्रेस अशा गद्दारांना कधीही परत पक्षात घेणार नाही. असा आरोप काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी केला आहे. तर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी भ्रष्टाचारी जनता पार्टीला घरी बसविण्यासाठी आम्ही काँग्रेसबरोबर युती केली आहे. पुढचा मुख्यमंत्री या युतीतीलच असेल. राज्यात भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. असे शरसंधान साधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT