राजेश फळदेसाई यांच्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने त्यांना कुंभारजुवेतून काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) म्हणून घोषित करण्याच्या उद्देशानेच पक्षामध्ये प्रवेश देण्याचे जवळ-जवळ नक्की केले आहे.
राजेश फळदेसाई यांच्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने त्यांना कुंभारजुवेतून काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) म्हणून घोषित करण्याच्या उद्देशानेच पक्षामध्ये प्रवेश देण्याचे जवळ-जवळ नक्की केले आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa Election: कुंभारजुवेतून काँग्रेसतर्फे राजेश फळदेसाई यांना उमेदवारी

दैनिक गोमन्तक

पणजी: कुंभारजुवे (Kumbhārajuve) मतदार संघातील युवानेते राजेश फळदेसाई (Youth leader Rajesh Phaldesai) यांना अखेर काँग्रेसने (Congress) आपल्या पक्षात ओढून आणले. फळदेसाई यांनी गेली पाच वर्षे केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन अनेक पक्ष त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक होते. गेले काही दिवस काँग्रेसचे नेते फळदेसाई यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. त्याला कारण म्हणजे गेली पाच वर्षे राजेश फळदेसाई यांनी कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये कामे केली आहेत आणि युवकांची फळी उभी केली आहे. फळदेसाई यांच्या कामाची दखल घेऊन काँग्रेसने त्यांना कुंभारजुवेतून काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate) म्हणून घोषित करण्याच्या उद्देशानेच पक्षामध्ये प्रवेश देण्याचे जवळ-जवळ नक्की केले आहे.

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काही दिवसांपूर्वी राजेश फळदेसाई यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राजेश फळदेसाई यांनी दोनापावला येथे जाऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गोवा निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम यांचीही भेट घेतली. त्यामुळे राजेश फळदेसाई यांचा काँग्रेस प्रवेश जवळजवळ नक्की झाला आहे.

याबाबत बोलताना राजेश फळदेसाई यांनी सांगितले की, आपण गेली पाच वर्षे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कुंभारजुवे येथील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवले. अनेक मंदिरे व इतर धार्मिक स्थळासाठी देणग्या दिल्या. त्याचबरोबर सुमारे १५०० शौचालये बांधण्यासाठी नागरिकांना आर्थिक मदत केली. गणेश विसर्जन तळी, शेड, रस्ते बांधले. युवकांच्या क्रिडा स्पर्धा असो किंवा सामाजिक संस्थांचे इतर उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम असोत त्यांनाही सढळ हस्ते मदत केली आहे. कुंभारजुवे मतदारसंघ अद्याप अविकसित असून जुने गोवे हे जागतिक पर्यटनाचे स्थळ आहे. मात्र या स्थळाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्या जवळ दर पावसाळ्यामध्ये पाण्याचे तळे साचते. तेथील पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या कामात विद्यमान आमदार आणि जुने गोव्याचे सरपंच यांना अपयश आले आहे. मतदारसंघातील रस्ते खराब आहेतच पण त्याच बरोबर रोजगार पूरक उद्योग नसल्यामुळे अनेक युवक बेरोजगार आहेत. आपण निवडून आल्यानंतर प्रदूषण मुक्त उद्योग येथे यावेत यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. त्याचबरोबर दिवाडी येथील पूल, बाजार संकूल, गवंडळी धावजी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल आदी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे फळदेसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

करमळी येथील तळ्याचे सौंदर्यीकरण करून ते पर्यटकांसाठी आकर्षक केले जाईल. आपल्या अनेक योजना कुंभारजुवे मतदारसंघासाठी असून काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे या पक्षातून आपण आपले राजकीय भवितव्य सुरू करण्याचे ठरवल्याचे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. आपल्या कामाची दखल घेऊन काँग्रेस नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आपण कुणाशी संपर्क न साधता आपले काम पाहून आपणास काँग्रेसची पक्षाची ऑफर आली असे फळदेसाई यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. आपल्या समर्थकांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास सहमती दिल्यानंतरच आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे सांगून काही दिवसांमध्ये आपण जाहीरपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

दरम्यान, राजेश फळदेसाई यांच्या रूपाने काँग्रेसला एक मोठा मासा मिळाल्याची चर्चा कुंभारजुवे परिसरामध्ये होत आहे. भाजपची उमेदवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक किंवा विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर वा त्यांच्या पत्नी जुने गोवेच्या सरपंच जेनिता मडकईकर यांना मिळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसला राजेश फळदेसाई यांच्या रूपाने एक चांगला उमेदवार मिळाल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT