Babashan  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: नुवेतून बाबाशान अपक्ष रिंगणात उतरणार

या मतदारसंघात बाबाशान यांच्यासह आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस), राजू काब्राल (तृणमूल) आणि दत्ता बोरकर (भाजप) हे अन्य उमेदवार आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: 2017 च्या निवडणुकीत मिकी पाशेको यासारख्या बलाढ्य राजकारण्याला अस्मान दाखवून नुवेतून लिलया निवडून आलेले बाबाशान डीसा हे यंदा मात्र अडचणीत सापडले आहेत. काँग्रेस सोडून भाजपशी (BJP) केलेला घरोबा आता त्यांना अडचणीचा ठरत आहे. या समस्येवर उतारा म्हणून आता त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election Latest News: Babashan to contest as independent candidate from Nuvem)

लोटली, वेर्णा, नागवा, नुवे, बेतालभाटी आणि माजोर्डा- कलाटा अशा सहा गावांचा समावेश असलेला नुवे हा मतदारसंघ पूर्णपणे ख्रिस्ती बहुल मतदारसंघ असून या मतदारसंघात भाजपचे नाव घेणे म्हणजे पाप करणे ,अशी मतदारांची भावना असते. या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्याचे कारण पुढे करून बाबाशान भाजपात गेले होते. मात्र मतदारसंघात रस्ते (Road) वगळता अन्य कुठलाही विकास झालेला नसल्याने आता हा त्यांचा निर्णय अंगाशी येण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात बाबाशान यांच्यासह आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस), राजू काब्राल (तृणमूल) आणि दत्ता बोरकर (भाजप) हे अन्य उमेदवार आहेत. वास्तविक हा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला समजला जात असला तरी आलेक्स सिक्वेरा सारख्या वय झालेल्या उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिल्याने या पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. पाऊसिलीप दोरादो यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला होता.

या मतदारसंघात (Constituency) अनेक कामे प्रलंबित असून डीसा यांना त्याचाच त्रास अधिक जाणवणार, असे वाटते. लोटली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करून त्याचे इस्पितळात रूपांतर करण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय या मतदारसंघात कचऱ्यामुळे जी समस्या निर्माण झाली, त्यावरही डीसा काही तोडगा काढू शकलेले नाहीत.

बेकायदा रेती उपसा गंभीर समस्या

बेकायदेशीर रेती उत्खनन ही या मतदारसंघाची आणखी एक समस्या असून बेसुमार रेती उपसा केला गेल्याने नदीचे काठ ढासळू लागले आहेत. या समस्येवरही बाबाशान प्रभावी तोडगा काढू शकले नव्हते. या साऱ्या गोष्टींना आता त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

विकासात नुवे मतदारसंघ मागेच !

गावात चांगले रस्ते तयार केले म्हणजे तो सर्वांगीण विकास होत नाही. सर्वांगीण विकास म्हणजे लोकांचे राहणीमान उंचावण्याची गरज असते.नुवेत नेमकी हीच बाब झालेली नाही, अशा प्रतिक्रिया मतदारांतून व्यक्त होत आहेत. विकासाबाबत आमचा आमदार पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे, अशा प्रतिक्रियांमुळे बाबाशान यांच्यासमोर आव्हान गडद होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT