आवेर्तान फुर्तादो यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करताना गोवा प्रभारी दिनेश राव, विरोधीपक्षने दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर व पदाधिकारी Dainik Gomantak
गोवा

Goa Election: आवेर्तान फुर्तादो यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश,नावेलीतून लढणार

कुणी नेता गेला म्हणून पक्ष संपत नाही. कॉंग्रेस (Congress) लोकांचा पक्ष आहे. लुईझीन फालेरोंनी (Luisin Faleron) स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि नावेली मुक्त झाली. युवा नेत्यांना संधी मिळाली.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मंत्री व नावेलीचे (Naveli) माजी आमदार आवेर्तान फुर्तादो (Avertan Furtado) यांनी आज कॉंग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. 2012 मध्ये ते अपक्ष म्‍हणून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांनी काल कॉंग्रेस पक्षासह आमदारकीचाही राजिनामा दिल्यानंतर नावेलीत कॉंग्रेसला उमेदवार हवा होता व फुर्तादोच्या रुपात त्यांना मजबूत उमेदवार मिळाला. आज पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात आपल्या समर्थकासह फुर्तादो यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव (Dinesh Rao), प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), विरोधीपक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), दक्षिण गोवा अध्यक्ष जो डायस उपाध्यक्ष आल्तीन गोम्स व आवेर्तान फुर्तादो यांचे समर्थक उपस्थित होते.

गोव्याच्या विकासासाठी लोकांना कॉंग्रेसचे सरकार हवे आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर येईल व स्थिर सरकार देईल. आवेर्तान फुर्तादोच्या रुपाने कॉंग्रेसला युवा नेता मिळाला आहे. असे प्रतिपादन यावेळी दिनेश राव यांनी केले. तर कॉंग्रेसमध्ये चांगले लोक येत असून आवेर्तान फुर्तादो स्वताच्या कर्तबगारीवर पुढे जाणारा नेता असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.

माझे कुटुंबीय कॉंग्रेमन

आपले कुटुंब कॉंग्रेसमन आहे. लुईझीन फालेरोमुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. फालेरोनी कॉंग्रेस सोडली आणि आपली वाट मोकळी झाली. नावेलीमधील लोक नेहमीच कॉंग्रेससोबत होते. पुढेही राहतील आवेर्तान फुर्तादो यांनी नमूद केले.

कुणी नेता गेला म्हणून पक्ष संपत नसतो

कुणी नेता गेला म्हणून पक्ष संपत नाही. कॉंग्रेस लोकांचा पक्ष आहे. लुईझीन फालेरोंनी स्वार्थासाठी पक्ष सोडला आणि नावेली मुक्त झाली. युवा नेत्यांना संधी मिळाली. तृणमुल कॉंग्रेसने यापुर्वीही गोव्यात निवडणुका लढवल्या होत्या. मात्र त्यांना गेवेकरांनी जवळ केले नाही. यावेळीही तसेच घडेल. असे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT