मोरजी: मांद्रे मतदार संघाची (Mandrem Constituency) कॉंग्रेसची (Congress Goa) उमेदवारी अजूनपर्यंत कुणाला ती ठरलेली नाही, मात्र मांद्रे मतदार संघातील गट कॉंग्रेस पक्षाने ज्यांच्या नावाची शिफारस करणार त्यावर राज्य समिती चर्चा करून नंतर केंद्रीय समितीकडे नावे पाठवली जाणार आहे. सचिन परब यांच्याकडून फक्त कामच करून घेणार की तिकीट पण देणार, या प्रश्नावर बोलतांना चोडणकर म्हणाले, " ज्याला कुणाला उमेदवारी द्यायची आहे, ते पक्ष ठरवेल मात्र आतापर्यंत कुणालाही उमेदवारी जाहीर झाली नाही असे स्पष्टीकरण चोडणकर यांनी मांद्रेमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. तुये येथे धनगर समाजाच्या कुटुंबियाना मांद्रेचे कॉंग्रेस नेते सचिन परब यांनी सोलर मार्फत विजेची सोय केली, त्यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते. (Goa Election 2022)
अजून युती झाली नाही
कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे युती केली (Alliance with Goa forward party) का असा प्रश्न विचारला असता, अजूनपर्यंत आम्ही कुणाकडे युती केली नाही युती स्थानिक नेत्यांना विश्वासात घेवूनच करणार, विजय सरदेसाई यांना 2017 च्या निवडणुकीत युती का केली नाही, त्या निवडणुकीत कॉंग्रेसकडे 17 आमदार असताना विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसला साथ का दिली नाही, त्याना आताच युतीची गरज का भासते असा सवाल गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला. 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेस मान्द्रेत कमी पडला का या प्रश्नाला उत्तर देताना, मान्द्रेतील कॉंग्रेसने मुख्यमंत्री पदावर असलेले लक्ष्मिकान्त पार्सेकर याना हरवून कॉंग्रेसची ताकत दाखवली होती, मात्र कॉंग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी (MLA Dayanand Sopate) मान्द्रेतील लोकाना दिल्लीत जावून विकले, कोण म्हणतो, 20 कोण म्हणतो, 30 कोण म्हणतो, 50 कोटीला स्वतःला विकले, आणि आता ते विकासाची बाता मारत आहेत. मान्द्रेच्या जनतेचा विश्वास हा कॉंग्रेसवर होता.
2019 च्या पोट निवडणुकीनंतर मान्द्रेत कॉंग्रेस पक्ष कुठेच नव्हता, त्याला सचिन परब यांनी संजीवनी दिले, त्यांच्यावर आगामी काळात अन्याय करणार का असा सवाल उपस्थित केला त्याला उत्तर देताना गिरीश चोडणकर (Congress Goa President Girish Chodankar) यांनी सांगितले न्याय अन्याय याची जाणीव कॉंग्रेस पक्ष तिकीट देताना नक्कीच ठेवणार आहे. लोकाना कोण हवा याचा विचार कॉंग्रेस पक्ष संघटना नक्कीच करणार आहे.
70 ते 80 टक्के युवकाना उमेदवारी
आगामी निवडणुकीत युवकाना प्रोत्साहन दिले जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले कि कॉंग्रेस पक्ष याही पुढे युवकाना प्रोत्साहन देणार आहे, किमान 70 ते 80 टक्के युवकाना उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले.
23 आमदार निवडून येणार?
गिरीश चोडणकर यांनी बोलताना गोवा फॉरवर्ड पक्षाने जशी आता युतीसाठी घाई केली, ती 2017 साली केली असती तर गोवेकरांच्या हिताचे सरकार स्थापन झाले असते, शिवाय गोवेकरांच्या विरोधात जे प्रकल्प लादले गेले ते बंद झाले असते, असा दावा करून आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचे किमान 23 आमदार निवडून येतील आणि त्यात युवकाचा जास्त भर असेल असे त्यांनी सांगितले. हे सरकार मोदी सरकारला मदत करणारे, जो मोदी क्लब आहे त्याचसाठी तयार केले, 17 आमदार असताना आमच्यासोबत कोणी यायला तयार नव्हते, मात्र आज अनेक पक्ष युती करायला तयार आहे केवळ पाच आमदार असताना, असे गिरीश चोडणकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.