5 young AAP workers resign, Goa
5 young AAP workers resign, GoaDainik Gomantak

Goa: दिल्लीत चर्च पाडल्याच्या निषेधार्थ आपच्या 5 युवा कार्यकर्त्यांचा राजीनामा

आप अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नसल्याने राजीनामा (Goa)
Published on

मडगाव: आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार असलेल्या नवी दिल्लीत चर्च (Delhi Church Demolition) पाडले गेले, आणि ही कारवाई बंद करण्यास केजरीवाल सरकारने (Kejariwal govt. Delhi) काहीच केले नाही, या घटनेचा निषेध करत आज गोव्यातील आपच्या 5 युवा कार्यकर्त्यानी पक्षाचा राजीनामा दिला (Resigned 5 AAP Activists). आज मडगावात (Margao) घेतलेल्या पत्रकार परिषदेत नुवे येथील लॉरेन्स डिसिल्वा आणि बाणावली येथील राजेश डिसोझा यांनी ही माहिती दिली. आणखी 20 युवक राजीनामा देण्याच्या वाटेवर आहेत. मात्र त्यापूर्वी ते गोवा निमंत्रक राहुल म्हाम्बरे यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे खुलासा मागणार असल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले.

5 young AAP workers resign, Goa
Goa Assembly Session: लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून - दिगंबर कामत

यावेळी बोलताना राजेश डिसोझा यांनी सांगितले. आता पर्यत आम्ही आप हा चांगला पक्ष असे सांगत आलो होतो. मात्र दिल्लीत चर्च मोडल्यापासून लोक आम्हाला तुमच्या 'आप'ने हे चर्च वाचवण्यासाठी काय केले असा सवाल करू लागले आहेत. आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांना या बद्दल विचारले तर तेही काही खुलासा करू शकत नाहीत. त्यामुळे आप अल्पसंख्याकांचे रक्षण करू शकत नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. सध्या गोव्यात जे रेशन वाटले जाते त्यासाठी पैसा कुठून येतो असे विचारले तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात. आप मध्ये आता पूर्वीप्रमाणे पारदर्शकता राहिलेली नाही त्यामुळेच आम्ही हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com