माजी नगराध्यक्ष 'नंदादीप राऊत' दैनिक गोमन्तक
गोवा

काँग्रेस उमेदवारीसाठी वास्कोमध्ये माजी नगराध्यक्ष 'नंदादीप राऊत' यांचे नाव चर्चेत

वास्को मतदारसंघात पुन्हा काँग्रेस येण्यासाठी एकमेव पर्याय नंदादीप राऊत असल्याचे वास्कोतील काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांचे मत

Dainik Gomantak

Goa Election 2022: काँग्रेस पक्षाच्या (Congress) उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष नंदादीप मनोहर राऊत (Nandadeep Raut) यांचे नाव पुढे येत असून प्राप्‍त माहितीनुसार राऊत यांना वास्कोतून (Vasco Constituency) काँग्रेसची उमेदवारी देण्यासाठी राज्यपातळी बरोबर केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.

नंदादीप राऊत यांना वास्कोतून वाढता प्रतिसाद

मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी पुढील वर्षी राज्यात होणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. त्यांना वास्कोतून वाढता प्रतिसाद लाभत आहे. नंदादिप राऊत यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पक्षाबरोबर राष्ट्रीय पक्षांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नंदादीप राऊत यांना सर्वच वास्कोत सर्वच स्तरातून पाठिंबा

सध्या राऊत यांना वास्कोमधून विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांबरोबर राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधलेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वास्कोतुन काँग्रेस पक्षाला नंदादीप राऊत योग्य उमेदवार असून त्यांना सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

वास्कोत काँग्रेस पक्षाला पुन्हा संजीवनी देण्यासाठी नंदादिप राऊतच योग्य पर्याय

वास्को काँग्रेस पक्षाला पुन्हा संजीवनी देण्यासाठी युवा नेता असणे गरजेचे आहे. यासाठी नंदादिप राऊत योग्य पर्याय असल्याची विविध स्तरातून माहिती प्राप्त होत आहे. मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्यांनी विविध प्रकल्पांना चालना दिली होती. तसेच पालिका निवडणुकीत त्याचा प्रभाग महिलांसाठी राखीव केल्याने त्याने प्रभाग १५ मधून आपल्या पत्नीला भरघोस मतांनी निवडून आणली होती.

गोवा प्रदेश काँग्रेसने लवकरात लवकर उमेदवार घोषित करावा

एकेकाळी वास्को मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा मतदारसंघात पुन्हा काँग्रेसला आणण्यासाठी एकच पर्याय नंदादीप राऊत आहेत, असे वास्कोतील वरिष्ठ काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते बोलत आहे. गोव्यात काँग्रेस पक्षाला वाढता प्रतिसाद लाभत असून यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने योग्य तो निर्णय घेऊन उमेदवार लवकर घोषित करावा अशा मागणीला जोर धरू लागला आहे. जेणेकरून उमेदवाराला जनसंपर्क वाढवण्यास वेळ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT